scorecardresearch

रतन टाटा करणार सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण! Alto पेक्षाही स्वस्त आणताहेत ‘ही’ Mini SUV

स्वस्त कारचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही कार बनवण्यात आली आहे.

Mini SUV TATA Nano
Mini SUV TATA Nano लवकरच लाँच होणार (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Mini SUV TATA Nano: टाटा नॅनो ही कार उद्योगपती रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जाते. स्वस्त कारचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही कार बनवण्यात आली, असा विश्वास रतन टाटा यांनी व्यक्त केला. त्यांनी खूप आधी नॅनो कार आणली होती. मात्र, नॅनो कारनंतर आता नॅनोचा आणखी एक नवीन प्रकार लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

Mini SUV TATA Nano

२००९ मध्ये टाटा नॅनो पहिल्यांदा रस्त्यावर दिसली आणि त्यानंतर २०१९ मध्ये टाटा नॅनो रस्त्यांवरून गायब झाली. भारतीयांनी ही कार पूर्णपणे नाकारली. टाटा मोटर्स कंपनीने जेव्हा त्यांची नॅनो कार लाँच केली होती तेव्हा ही भारतासह जगभरातली सर्वात स्वस्त कार होती. या कारची किंमत एक लाख रुपये होती. ही कार सर्व प्रकारे गरिबांसाठी बनवण्यात आली होती. पण नंतर काही वर्षांनी ही कार बाजारात कमी विकली जाऊ लागली, ज्यामुळे कंपनीने तिचे उत्पादन खूप कमी केले. त्यानंतर BS-IV उत्सर्जनाचे नियम आले ज्यामुळे नॅनो कार बंद करावी लागली.

(हे ही वाचा : TATA Red Dark Edition: TATA ने आणल्या ३ जबरदस्त ब्लॅक कार, फीचर्समध्ये आहेत ‘बाप’! किंमत फक्त… )

रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न त्यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा पूर्ण होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी नॅनोची कथा शेअर केली होती. आता पुन्हा एकदा मिनी एसयूव्ही टाटा नॅनो ज्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते ते लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. यामध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फीचर्स मिळणार आहेत. ही Mini SUV TATA Nano तुम्हाला अल्टोपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 14:51 IST
ताज्या बातम्या