मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ४.८७ टक्क्यांनी घसरून २,७१,३५८ युनिट्सवर आली आहे. ऑटोमोबाईल डीलर्सची संस्था FADA ने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, मार्च २०२१ मध्ये प्रवासी वाहनांच्या २,८५,२४० युनिट्सची विक्री झाली होती, तर मार्च २०२२ मध्ये २,७१,३५८ युनिट्सची विक्री झाली. मागील महिन्यात दुचाकींची विक्री ४.०२ टक्क्यांनी घसरून ११,५७,६८१ युनिट्सवर आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १२,०६,१९१ युनिट होती. व्यावसायिक वाहनांची विक्री १४.९१ टक्क्यांनी वाढून ७७,९३८ युनिट्स झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये ६७८२८ युनिट्स होती. तीनचाकी वाहनांची विक्री देखील मार्च २०२१ मध्ये ३८,१३५ युनिट्सच्या तुलनेत २६.६१ टक्क्यांनी वाढून ४८,२८४ युनिट्सवर गेली आहे. वाहनांची एकूण विक्री २.८७ टक्क्यांनी घसरून १६,१९,१८१ युनिट्सवर गेली आहे जी मागील वर्षी याच महिन्यात १६,६६,९९६ युनिट्स होती.

या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे असे करण्यात आल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्यात २२ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, “ग्रामीण संकटामुळे दुचाकी सेगमेंट आधीच खराब कामगिरी करत आहे. वाहनांच्या मालकीच्या खर्चात वाढ आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे त्यात आणखी घट झाली.

Renault Duster बद्दल मोठी बातमी, SUV भारतात बंद होणार आहे का? जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, “गेल्या महिन्याच्या तुलनेत पुरवठ्यात किंचित सुधारणा झाली असली तरी, प्रवासी वाहनांसाठी जास्त मागणी आहे आणि दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय. कारण सेमीकंडक्टरची उपलब्धता अजूनही एक आव्हान आहे.रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमधील लॉकडाऊनमुळे पुरवठा आणखी कमी होईल, ज्यामुळे वाहनांच्या पुरवठ्यावरही परिणाम होईल.”