कार क्षेत्रात हॅचबॅक सेगमेंटची मागणी सर्वाधिक आहे, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये येणाऱ्या कार किमती आणि मायलेजच्या दृष्टीने किफायतशीर असतील. पण यासोबतच या सेगमेंटमध्ये काही प्रीमियम कार आहेत, ज्या त्यांच्या किंमती आणि मायलेज व्यतिरिक्त त्यांच्या फीचर्ससाठी आणि डिझाईनसाठी पसंत केल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यामध्ये आम्ही या सेगमेंटमधील लोकप्रिय कार Hyundai i20 बद्दल बोलत आहोत, जी एक प्रीमियम हॅचबॅक आहे. जर तुम्ही ही कार शोरूममधून खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ७ ते १२ लाख रुपये खर्च करावे लागतील.

पण इथे आम्ही तुम्हाला अशा ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही ही कार फक्त २ लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. या ऑफर्स सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती देत ​​आहोत.

आणखी वाचा : तुम्हाला फास्ट स्पीडची आवड असेल तर केवळ ३० हजारांत घ्या Bajaj Pulsar NS200

या कारवर पहिली ऑफर CARTRADE वेबसाईटवर देण्यात आली आहे. या Hyundai i20 चे 2010 चे मॉडेल येथे पोस्ट केले आहे. येथे त्याची किंमत दीड लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र या कारसोबत येथे कोणत्याही ऑफर नसतील.

दुसरी ऑफर CARDEKHO वेबसाइटवर पोस्ट केली गेली आहे जिथे Hyundai i20 चे २०११ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. येथे त्याची किंमत १.९५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून कार खरेदी करताना कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवर दिली आहे. इथे या कारचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या कारची किंमत १.५ लाख रुपये निश्चित करण्यात आली असून त्यासोबत कोणतेही कर्ज किंवा अन्य प्लॅन्स मिळणार नाही.

आणखी वाचा : Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये देते १६० किमी रेंज, किंमत जाणून घ्या

Hyundai i20 वर उपलब्ध ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर तुम्हाला या कारचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती कळू शकते, जेणेकरून तुम्हाला या माहितीसाठी इतरत्र जावे लागणार नाही.

Hyundai i20 २०१२ मॉडेलच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे झाले तर, यात ११९७ cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८२.८५ bhp पॉवर आणि ११३.७ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार १९.६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand hyundai i20 under 2 lakh read offer and full details of car prp
First published on: 15-07-2022 at 20:05 IST