भारतातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीचे एक अनोखे आकर्षण आहे. लोक त्याच्या गाड्यांसाठी वेडे आहेत. आता लोक मारुतीने गेल्या महिन्यात लाँच केलेल्या दोन कारच्या मागे लागले आहेत. Maruti Suzuki Jimny आणि Maruti Fronx अशी या गाड्यांची नावे आहेत. कंपनीने गेल्या महिन्यातच दोन्ही कारचे बुकिंग सुरू केले होते. Maruti Suzuki ने भारतीय बाजारात आपली बहुप्रतीक्षित ५ डोर (पाच दरवाजाची) जिम्नी आणि मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ग्रेटर नोएडा मध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये ग्लोबल डेब्यू केले होते.

आतापर्यंत दोघांचे बुकिंग २५,००० च्या वर पोहोचले आहे. थारच्या टक्करमध्ये आलेली जिम्नी सर्वाधिक पसंत केली जात आहे. एकट्या जिमनीने बुकिंगचा आकडा १८,००० ओलांडला आहे, तर दुसरीकडे टाटा पंच सारख्या वाहनांशी स्पर्धा करण्यासाठी मारुतीची क्रॉसओवर फ्रॉन्क्स लाँच करण्यात आली आहे, ज्यांचे बुकिंग ६,५०० ओलांडले आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Agra Woman Plans Husband Murder
पतीला ठार करण्यासाठी पत्नीने दिली ऑनलाईन ‘सुपारी’, What’s App वर ठेवलं ‘हे’ स्टेटस

(हे ही वाचा: Bike Sales: ‘या’ बाईकसमोर सर्व झालेत फेल, विक्री झाली जोमात, पाहताच तुम्हीही पडाल प्रेमात!)

Maruti Suzuki Jimny 5 door अशी आहे खास

जिम्नी 5-डोर व्हेरिएंटची लांबी ३,८५० मिमी, रुंदी १,६४५ मिमी आणि उंची १,७३० इतकी मिमी आहे. या एसयूव्हीचा व्हीलबेस २,५५०mm आहे. तर, लांबी आणि व्हीलबेस ३०० मिमीने वाढली आहे. 5 डोअर जिम्नीला सध्याच्या ३ डोअर जिम्नीच्या तुलनेत बॉक्सी आणि रेट्रो इन्स्पायर्ड डिझाइन आहे. याचा व्हीलबेस ३०० मिमी आहे. तसेच, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फ्रंट ग्रिल आणि बंपर वेगळ्या डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहेत.

मारुती सुझुकीने जिम्नी ५ डोरमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१ बीएचपी पॉवर आणि १३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच, ४X४ व्हील ड्राइव्ह फीचर देखील मिळते.

(हे ही वाचा: Maruti Suzuki Discounts: अल्टो ते वॅगनआरसह मारुतीच्या ‘या’ कार स्वस्तात खरेदी करा, मिळतोय तगडा डिस्काउंट)

Maruti Suzuki Fronx अशी आहे खास

Maruti Suzuki Fronx ही कार NEXA डीलरशिपद्वारे विकली जाईल. यात स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासह १.२-लिटर ड्युअलजेट पेट्रोल आणि १.०-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळेल. कारमध्ये AMT सोबत ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय दिला जाईल.

Maruti Suzuki Fronx SUV चा लूक हा कूपे स्टाइल प्रमाणे दिसत आहे. फ्रॉन्क्स कार ही मारुती सुझुकीची नवीन SUV कार असेल. त्यामध्ये नवीन केबिन आणि वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. ९-इंच स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ४०+ इंटेलिजेंट कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आणि ६-स्पीकर मिळतात आणि ६ एअरबॅग सह अनेक फीचर्स मिळतील.