ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा अनेक आकर्षित करणाऱ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन येत असतात. आता असाच एक सर्वांना चकीत करणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक चकीतच झाले आहेत.

सोशल मीडियावर होतोय खूप व्हायरल

वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडिओत जुना स्कूटर दिसत आहे. एक माणूस स्कूटरवर बसलेला दिसत आहे. जो एका बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षित आहे.

(आणखी वाचा : कार खरेदीचा विचार करताय? मग आताच करा! पुढील वर्षात देशातील ‘ही’ आघाडीची कार कंपनी करणार गाड्यांच्या किमतीत वाढ )

या जुन्या स्कूटरचा वापर करून कन्स्ट्रक्शन साईटवर वापर केला जात आहे. या जुन्या स्कूटरचे रुपांतर सिमेंटच्या पिशव्या नेणाऱ्या मशीनमध्ये करण्यात आले आहे आणि या स्कूटरचा वापर करुन सिमेंटच्या पिशव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचवण्याचं काम करताना दिसत आहेत. या स्कूटरच्या रिअर व्हीलला एक दोरी बांधली आहे. ज्याद्वारे सामान सहजपणे ३ ते ४ मजले वर चढवता येत आहे.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी या कामगारांचे कौतुक केले आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ ६६,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यांनी कदाचित यासाठीच इंजनला पॉवरट्रेन म्हटलं जातं, असे म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की,कोणतीही व्यक्ती ही पॉवर कोणत्याही ठिकाणी वापरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांनी या स्कूटरची किंमत देखील सांगितली आहे. “अशा प्रकारच्या स्कूटर्स सेकेंड हँड वाहनांच्या बाजारात २ हजार ते ४ हजार रुपयांमध्ये मिळतात, असे एका युजरने म्हटलं आहे.