scorecardresearch

Toyota ने सादर केली Camry Nightshade Special Edition, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

टोयोटा मोटर्सने ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरीची एक स्पेशल एडिशन सादर केलंय. ज्याला कंपनीने टोयोटा केमरी नाईटशेड असे नाव दिले आहे.

Toyota-Camry-Nightshade-Special-Edition
(फोटो- TOYOTA)

टोयोटा मोटर्सने ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरीची एक स्पेशल एडिशन सादर केलंय. ज्याला कंपनीने टोयोटा केमरी नाईटशेड असे नाव दिले आहे. Toyota Camry या स्पेशल एडिशनला आणखी खास बनवण्यासाठी कंपनीने अगदी नवीन एक्सटीरियर कलर थीम आणि अपडेटेड इंजनसारखे नवीन फिचर्स जोडले आहेत.

टोयोटाने ही स्पेशल एडिशन पाच व्हेरिएंटसह सादर केली आहे ज्यात पहिला व्हेरिएंट LE, दुसरा XLE, तिसरा SE, चौथा SE नाइटशेड आणि पाचवा XSE व्हेरिएंट आहे.

टोयोटा केमरी नाईटशेडच्या डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीने हे सर्व ब्लॅक थीम अंतर्गत डिझाइन केलं आहे, ज्यात ब्लॅक फ्रेम केलेले हेड लॅम्प, ब्लॅक फ्रेम केलेले टेल लॅम्प, रियर स्पॉयलर, लिड आणि ब्लॅक एक्सटीरियर एम्बलमचा समावेश आहे. याशिवाय, या स्पेशल एडिशनमध्ये कंपनीने 19-इंचाचे अलॉय व्हील लावले आहेत ज्यामध्ये मॅट ब्रॉन्झ फिनिश देण्यात आले आहे.

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने सध्याच्या कारमध्ये फारसा बदल केलेला नाही. या कारमध्ये आधीच प्रीमियम आणि हाय-टेक फिचर्स आहेत ज्यामध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात मोठा बदल केला असून त्यात दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. त्याचे पहिले इंजिन चार सिलिंडर असलेले 2.5 लिटरचे इंजिन आहे, हे इंजिन आठ-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. दुसरे इंजिन चार सिलिंडर असलेले 3.5 लिटरचे इंजिन आहे, या इंजिनसोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सही देण्यात आला आहे.

कंपनीने भारतात Toyota Camry Nightshade लाँच करण्याच्या तारखेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु वृत्तानुसार, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कंपनी भारताच्या स्थानिक बाजारपेठेत ही स्पेशल एडिशन लॉन्च करू शकते. कंपनीने किंमतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु कंपनी ४५.५० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च करू शकते.

एकदा भारतात लॉन्च झाल्यानंतर ही टोयोटा कॅमरी नाईटशेड स्पेशल एडिशन कोणत्याही कारशी स्पर्धा करणार नाही. कारण ही प्रीमियम किंमत असलेली सेडान या प्राइस रेंजमधली एकमेव आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-05-2022 at 20:01 IST

संबंधित बातम्या