Bajaj Triumph Upcoming Bikes: बजाज आणि ट्रायम्फची जोडी 400cc बाईक सेगमेंटमध्ये आपल्या नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत काहीतरी नवीन देण्यासाठी बजाज-ट्रायम्फ दोन नवीन बाईक लाँच करणार आहे. याआधी बजाज ऑटो आणि ट्रायम्फ यांनी मिळून भारतीय बाजारपेठेत उत्तम बाईक्स लाँच केल्या आहेत. Triumph Speed 400 आणि Triumph Scrambler 400x हे मिड-रेंज मोटरसायकल सेगमेंटमध्ये लाँच केले गेले. या बाईक्स जून २०२३ मध्ये लाँच करण्यात आल्या होत्या. ज्यात भारत तसेच युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि जपानचा समावेश आहे. दरम्यान, चला जाणून घेऊया नवीन बाईकशी संबंधित सर्व डिटेल्स. दिवाळीच्या आधी बजाज ट्रायम्फच्या दोन नवीन बाईक लाँच होऊ शकतात. तुम्हीही जर 400cc सेगमेंटमध्ये नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तयार व्हा, कारण Bajaj-Triumph च्या दोन नवीन बाईक भारतात लाँच होणार आहेत. सध्या ट्रायम्फ भारतात फक्त Speed 400 आणि Scrambler 400X सारख्या एंट्री बाईक्सची विक्री करते आणि ग्राहकांनाही या दोन बाईक्स खूप आवडतात. या हाय परफॉर्मन्स बाईक्स आहेत, ज्या फक्त तरुणांना आकर्षित करतात. विशेष म्हणजे त्यांची किंमतही बजेटमध्ये आहे. Triumph Thruxton 400 या नावाने बाईक लाँच होऊ शकते ब्रिटीश बाईक निर्माता ट्रायम्फने याआधीच पुष्टी केली होती की, श्रेणी वाढवण्यासाठी दरवर्षी 400cc सेगमेंटमध्ये नवीन बाईक समाविष्ट केली जाईल. पण, सूत्रांनुसार कंपनी लवकरच दोन नवीन बाईक लाँच करणार असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रायम्फ स्पीड 400 नावाचे सेमी-फेअर कॅफे रेसर मॉडेल तयार करत आहे आणि ते चाचणीदरम्यान अनेक वेळा पाहिले गेले आहे. हेही वाचा >> Ola Electric Bike: अखेर प्रतीक्षा संपली! इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ, पाहा बाईकची पहिली झलक 400cc पॉवरफूल इंजिन बाईकला 399cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळेल, जे 39.5 bhp पॉवर आणि 37.5Nm टॉर्क निर्माण करेल, जे स्लिपर आणि असिस्ट क्लच तसेच राइड-बाय-वायर थ्रॉटल सिस्टमसह 6-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज असेल. आता ही सिस्टम चांगला परफॉर्मन्स तर देईलच, पण मायलेजही वाढेल. बजाज ऑटो आपली उत्पादन क्षमता दरमहा ५,००० युनिट्सवरून १०,००० युनिट्सपर्यंत वाढवणार आहे. हा विस्तार ऑक्टोबर २०२४ पर्यंत होणे अपेक्षित आहे.