स्कूटर सेगमेंटमध्ये कंपन्यांचा विविध प्रकारच्या गाड्या आहेत. यामध्ये तुम्हाला स्पोर्टी डिझाइन आणि हाय स्पीड स्कूटरसह चांगला मायलेज देणार्‍या स्कूटर मिळतात. जर तुम्हाला स्पोर्टी डिझाइनसह मायलेज देणारी स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुमच्या बजेटमध्ये बसू शकणार्‍या १२५ सीसी दोन हायस्पीड स्कूटरची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या. या तुलनेसाठी TVS Ntorq 125 आणि Aprilia SR 125 आहेत. या दोन स्कूटरच्या इंजिन पॉवरपासून ते मायलेजपर्यंत प्रत्येक तपशील कळेल.

Aprilia SR125: एप्रीलिया एसआर १२५ स्कूटर कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरच्या यादीत येते. ही गाडी तीन प्रकारांसह बाजारात दाखल झाली आहे. स्कूटरमध्ये १२४.४५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जास्तीत जास्त ९.९२ पीएस पॉवर आणि ९.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर ३८ किमीचा मायलेज देते आणि ARAI द्वारे प्रमाणित केलं आहे. एप्रीलिया एसआर १२५ ची सुरुवातीची किंमत ९६,०३७ रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना १.०८ लाखांपर्यंत जाते.

गाडीचा टायर जुना झाला की नाही? आता लगेच कळणार, CEAT नं आणलं कलर इंडिकेटर्स मार्क

TVS Ntorq 125: टीव्हीएस एनटॉर्क १२५ ही या सेगमेंटमधील लोकप्रिय स्कूटर आह. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. स्कूटरमध्ये १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिनसह सिंगल सिलिंडर आहे. जे १०.२ पीएस पॉवर आणि १०.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. टीव्हीएस एनटॉर्क १२५ च्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवले आहेत. मायलेजबद्दल कंपनी दावा करते की, ही स्कूटर ५४.३३ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस एनटॉर्क १२५ ची सुरुवातीची किंमत ७५,४४५ रुपये (एक्स-शोरूम) आहे. जी टॉप व्हेरियंटवर ८७,५५० रुपयांपर्यंत जाते.