देशातील तरुणांमध्ये स्पोर्ट्स बाईक सर्वाधिक लोकप्रिय आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्पोर्ट्स बाइक बाजारात उपलब्ध आहेत. मात्र अनेकांचं बजेट नसल्याने काही जणांना स्वस्त बाइककडे मोर्चा वळवावा लागतो. कारण त्यांची किंमत सामान्य बाईकपेक्षा खूप जास्त आहे. पण तरीही, जर तुम्हाला स्पोर्ट्स बाईक घ्यायची असेल, तर तुम्हाला टीव्हीएस, यामाहा आणि केटीएम सारख्या कंपन्यांच्या स्पोर्ट्स बाइक्स ड्रूम वेबसाइटवर स्वस्तात उपलब्ध आहेत. TVS Apache RR310, KTM Duke 125cc आणि Yamaha YZF-R15 V3 या काही दिवस वापरलेल्या स्पोर्ट्स बाइक्स वेबसाइट Droom वर अपडेट केल्या आहेत. तुम्ही या बाइक्स ईएमआय पर्यायावर खरेदी करू शकता आणि तुम्हाला या सर्व बाइक्सवर सहा महिन्यांची वॉरंटी मिळेल. या सर्व बाइक्सची माहिती जाणून घेऊया.

TVS Apache RR310 – वेबसाइटवर अपडेट केलेली टीव्हीएसची ही बाईक २०२० चे मॉडेल आहे आणि तिची किंमत १ लाख ९६ हजार रुपये आहे. ही बाईक केवळ ३८०० किमी धावली आहे, जर तुम्ही ही बाइक विकत घेतली तर तुम्ही दुसरे मालक व्हाल. तसेच, ही बाईक ५,७१६ रुपयांच्या ईएमआयवर सहज खरेदी करता येईल.

Yamaha YZF-R15 V3 – यामाहा बाईक २०२० चं मॉडेल आहे, ही बाईक फक्त १०१३ किमी चालली आहे. ही बाइक विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याचे दुसरे मालक व्हाल. या बाइकची किंमत १ लाख ३४ हजार रुपये आहे. तुम्ही ३,९०८ च्या ईएमआय पर्यायावर देखील खरेदी करू शकता.

तुम्हाला गाडी चालवायला शिकायची आहे का? मारुती सुझुकीच्या कोर्स आणि फिबाबत जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

KTM Duke 125cc – ही केटीएम बाईक २०२० चं मॉडेल आहे आणि ही बाईक फक्त २३४० किमी धावली आहे. तुम्ही केटीएमची बाईक विकत घेतल्यास, तुम्ही तिचे दुसरे मालक व्हाल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही बाइक १ लाख ३६ हजार ५८९ रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, तुम्ही प्रति महिना ३,९८३रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.