Vehicle Steering Shake : गाडी चालवताना सुरक्षेचे सर्व उपाय केले पाहिजेत. दूरच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी तिची आवश्यक तेव्हा सर्व्हिसिंग केली पाहिजे. असे केल्यास तुम्ही सुरक्षित राहाल. तसेच गाडी चालवताना वाहनामध्ये काही गडबड असल्यास त्याबाबत सतर्क राहवे. गाडी चालवताना जेव्हा वाहनाची स्पीड कमी किंवा अधिक होते तेव्हा तिच्या स्टिअरिंग व्हीलमध्ये कंपन होत असल्याचे तुम्हाला दिसून आले असेल. अनेक लोक यास सामान्य मानतात, मात्र त्यामागे अनेक मोठे दोष कारणीभूत असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या वाहनाला मोठे नुकसान होऊ शकते. स्टिअरिंग व्हीलमध्ये कंपन होण्यामागे कोणती कारणे असू शकतात? जाणून घेऊया.

१) सपाट टायर

वाहन स्पीड पकडताना स्टिअरिंग व्हीलमध्ये कंपन होण्यामागे सर्वात सामान्य कारणे म्हणजे, फ्लॅट टायर. सपाट टायर्सचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कारचा कोपरा रस्त्याखाली उतरवून चालवणे. यामुळे टायरवर खूप दबाव येतो आणि चाकालाच नुकसान होऊ शकते. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, अपघात होऊ शकतो.

(Year ender 2022 : २०२२ मध्ये ‘या’ 4 स्कुटर्सनी ग्राहकांच्या मनावर केले राज्य, खरेदीपूर्वी टाका एक नजर)

२) व्हील बॅलन्स ठीक न राहणे

व्हील बॅलन्स असणे कोणत्याही वाहणासाठी खूप आवश्यक आहे. ते ठीक न राहिल्यास ड्रायव्हिंगमध्ये अडचण येऊ शकते, तसेच चाकांवर त्याचा जास्त प्रभाव होतो. व्हील बॅलन्स बरोबर न राहिल्यास त्याने वाहनावर पडणारा ताण थेट स्टिअरिंगवर कंपनाच्या स्वरुपात दिसू शकतो.

३) बॉल जॉइंट

बॉल जॉइंट फ्रंट व्हील सस्पेंशन आर्म्सला व्हील हबशी जोडल्या जाते, ज्यामुळे सस्पेन्शनला शक्ती मिळते. जेव्हा हे जॉइट्स तुटतात तेव्हा सस्पेन्शनला खूप जास्त किंवा खूप कमी प्रतिरोधाचा सामना करावा लागतो आणि यामुळे स्टिअरिग व्हीलमध्ये कंपन होऊ शकते.

(लाँग टूरसाठी जात आहात? मग सुखद प्रवासाठी ‘या’ ५ वस्तू जवळ ठेवा)

४) व्हील बेअरिंगचे तुटने

चाकांना सहज घुमवणे हे बेयरिंगचे काम आहे. जेव्हा तो तुटतो तेव्हा कोणत्याही फिरत्या गतीमध्ये चाके डोलतात. हे स्टिअरिंग व्हीलवर कंपन निर्माण करू शकते. जेव्हा ते फार गंभीर होते तेव्हा त्यास कोणत्याही गतीमध्ये अनुभवता येऊ शकते.