वर्ल्ड स्टॅण्डर्ड्स वेबसाइटनुसार जगातील ३५ टक्के लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये डाव्या बाजूने गाड्या चालवल्या जातात. यापैकी अनेक देश हे असे देश आहेत ज्यांच्यावर पूर्वी ब्रिटीशांनी राज्य केलं होतं, जिथे ब्रिटीशांची सत्ता होती. ब्रिटीश काळामध्ये गाड्या डाव्या बाजूने चालवण्याची पद्धत होती. बरं हे असं का असा प्रश्न पडला असेल तर त्याची कारणंही भन्नाट होती. यावरच नजर टाकूयात…
(हे ही वाचा : देशातील बेस्ट सेलिंग ७-सीटर SUV खरेदी करा Nexon च्या किमतीत, हजारो ग्राहक लागले रांगेत )
घोडागाडी डाव्या बाजूने चालायची
डावीकडे वाहन चालवणाऱ्या देशांमध्ये, असा युक्तिवाद केला जातो की, घोडागाड्याच्या काळात लोक डाव्या हाताने घोडागाडी चालवत असत, जेणेकरून आवश्यक असल्यास, डाव्या हाताचा वापर लढण्यासाठी किंवा एखाद्याचा हल्ला टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. कारण बहुतेक लोक उजव्या हाताचा जास्त वापर करतात. नंतर वाहने येताच त्यानुसार धावू लागली. तथापि, ही प्रवृत्ती विशेषतः त्या देशांमध्ये अधिक दिसून येते, जे एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याखाली होते.
कोणत्या बाजुने गाडी चालवणे अधिक सुरक्षित का मानले जाते?
किंबहुना, ज्या देशांमध्ये उजवीकडे वाहने चालवण्याचे नियम आहेत, त्यामागील कारण म्हणजे बहुतेक लोकांच्या उजव्या हाताचा वापर असे मानले जाते. यासोबतच उजव्या बाजूने गाडी चालवल्यास समोरून येणारी वाहने अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येतात, त्यामुळे अपघाताची शक्यता कमी असते, असाही तर्क आहे.
(हे ही वाचा : Mahindra, Tata चा खेळ संपणार, सुझुकीने नव्या अवतारात दाखल केली ‘ही’ लोकप्रिय कार, किंमत…)
उजवीकडे गाडी चालवणे अधिक सुरक्षित
विविध देशांच्या साईड ड्रायव्हिंगबाबत जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनानुसार, ज्या देशांमध्ये वाहने उजवीकडे चालतात, त्या देशांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण डावीकडील वाहनांपेक्षा कमी आहे. दुसरीकडे, स्वीडिश नॅशनल रोड अँड ट्रान्सपोर्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आणखी एका संशोधनानुसार, डाव्या हाताऐवजी उजव्या हाताने गाडी चालवल्याने रस्ते अपघात ४० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. फ्रान्समध्ये १७९२ मध्ये उजवीकडे ड्रायव्हिंग सुरू करण्यात आली, तर स्वीडनमध्ये १९६७ मध्ये उजवीकडे ड्रायव्हिंग सुरू करण्यात आली.
दरम्यान, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी मते आणि युक्तिवाद दिले जातात, तर रस्त्याने चालण्याची आणि प्रवास करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी असण्याची शक्यता जास्त आहे जे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे असायचे. पुढे वाहनांचा शोध लागला आणि त्यांनीही घोडागाडीचे वाहतूक नियम अंगीकारले.