Women’s day scooters: दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५) साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः महिलांना समर्पित आहे. या खास प्रसंगी, आज आपण महिलांसाठी कोणत्या स्कूटर सर्वोत्तम असतील याची माहिती जाणून घेणार आहोत. या अशा स्कूटर्स आहेत, ज्या चालवायला खूप सोप्या तर आहेतच; पण त्याचबरोबर त्या खूप किफायतशीर आणि आरामदायीही आहेत.

TVS ज्युपिटर ११०

मुली आणि कुटुंबांसाठी टीव्हीएस ज्युपिटर हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ही त्यांच्या सेग्मेंटमधील सर्वांत सुंदर दिसणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे आणि त्याची फीचर्सदेखील अद्भुत आहेत. ही स्कूटर दैनंदिन वापरासाठी उत्कृष्ट ठरू शकते. टीव्हीएस ज्युपिटर आता अधिक स्मार्ट आणि प्रीमियम झाली आहे.

इतकंच नाही, तर तुम्ही तुमचा स्मार्टफोनदेखील या स्कूटरला कनेक्ट करू शकता. या स्कूटरमध्ये अशा अनेक सर्वोत्तम आणि फर्स्ट इन क्लास फीचर्सचा समावेश आहे. ज्युपिटर ११० स्कूटरमध्ये ११३.३ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे ५.९ किलोवॉट पॉवर आणि ९.८ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर शहरात अगदी सहजपणे हाताळता येते. त्याची एक्स-शोरूम किंमत ७३,७०० रुपयांपासून सुरू होते.

एथर रिझ्ता (Ather Rizta)

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही एथर एनर्जीची रिझ्ता इलेक्ट्रिक स्कूटरदेखील खरेदी करू शकता. ही स्कूटर विशेषतः कुटुंबांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. या एथर स्कूटरमध्ये ३.७ किलोवॉट क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो १६० किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करतो. या स्कूटरची सीट सर्वांत लांब आहे, ज्यामुळे त्यावर दोन लोक आरामात बसू शकतात.

या स्कूटरच्या सीटखाली ३४ लिटरची बूट स्पेस आहे. त्यात सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे. रिझ्तामध्ये सात इंचांचा टीएफटी स्क्रीन आहे, जो नोटिफिकेशन अलर्ट, लाइव्ह लोकेशन आणि गूगल मॅप्सला सपोर्ट करतो. या स्कूटरची किंमत १.३५ लाख रुपयांपासून सुरू होते.

हीरो प्लेजर Plus Xtec (Hero Pleasure Plus Xtec)

हीरो मोटोकॉर्पची प्लेजर प्लस एक्सटेक स्कूटर मुली आणि महिलांसाठी एक चांगला पर्याय असू शकते. या स्कूटरची किंमत ७१,७६३ रुपयांपासून ते ८३,८१३ रुपयांपर्यंत आहे. कंपनीने विशेषतः मुलींना लक्षात घेऊन ती डिझाइन केली आहे. हीरो प्लेजर ही एक चांगली स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन स्कूटरशी कनेक्ट करू शकता. आता त्यात प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्पदेखील असेल, जो रात्रीच्या वेळी चांगला प्रकाश देण्यास मदत करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्कूटरमध्ये ११० सीसी इंजिन आहे जे ८ बीएचपी पॉवर आणि ८.७ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन मायलेज आणि कामगिरीच्या बाबतीत चांगले मानले जाते. ही स्कूटर चालवायला खूप सोपी आहे. त्याची सीट लांब आणि मऊ आहे, जी तुम्हाला चांगल्या राइडचा अनुभव देते आणि तुम्हाला सीटखाली चांगली जागादेखील मिळते. मागे बसणाऱ्याला आराम मिळावा यासाठी सीट बॅकरेस्टमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.