PAN Documentation : पॅन कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला काही ठराविक कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्यामध्ये तुम्हाला ओळखीचे पुरावे आणि इतर सरकारने जारी केलेले कागदपत्र जोडावी लागतात. पॅन कार्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने दाखल करू शकता. यासाठी दोन वेगवेगळे पर्याय देण्यात आलेले आहेत.
ज्यापैकी एक म्हणजे ४९अ अर्ज आणि दुसरा ४९अअ अर्ज जोकी परदेशी नागरिकांसाठी असतो. तसेच नवीन पॅन कार्डबरोबरच तुम्ही पॅन कार्डच्या रिप्रिंटसाठी देखील अर्ज करू शकता.
पॅनकार्डसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) जे भारताचे नागरिक आहेत (यामध्ये परदेशात राहणाऱ्यांचाही समावेश होतो) साठी आवश्यक कागदपत्रे –
ओळखीची पुरावा
- मतदान ओळखपत्र
- आधार कार्ड
- अर्जदाराचा फोटो असणारे रेशन कार्ड
- पासपोर्ट
- वाहन चालवण्याचा परवाना
- शस्त्र परवाना
- राज्य किंवा केंद्र सरकारकडून देण्यात आलेले ओळकपत्र
- केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे कार्ड
- अर्जदाराचा साक्षांकित केलेला फोटो असलेले बँकेचे प्रमाणपत्र आणि अर्जदाराचा बँक खाते क्रमांक
- पेन्शन कार्ड ज्यावर अर्जदाराचा फोटो असेल
- संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य किंवा नगरपालिका नगरसेवक यांनी स्वाक्षरी केलेले मूळ ओळख प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
- फोटो असलेले मतदान ओळखपत्र
- आधार कार्ड
- चालू महिन्याचे वीज बिल
- पासपोर्ट – (स्वत:चा तसेच तुमच्या जोडीदाराचा)
- वाहन चालवण्याचा परवाना
- लँडलाइन टेलिफोन बिल , ब्रॉडबँड कनेक्शन बिल, पाणी बिल, पाईप गॅस बिल (तीन महिन्यांपेक्षा जास्त नसावे)
- पोस्ट ऑफीस पासबुक ज्यामध्ये अर्जदाराचा पत्ता असेल
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- सरकारने दिलेले डोमिसाईल प्रमाणपत्र
जन्म तारखेचा पुरावा किंवा वयाचा पुरावा
- महानगरपालिकेने किंवा कोणत्याही अधिकृत रजिस्ट्रार कार्यालयाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
- पेन्शन पेमेंट ऑर्डर
- विवाह प्रमाणपत्र
- पासपोर्ट
- वाहन चालवण्याचे प्रमाणपत्र
- मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र
- केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेल डोमिसाईल प्रमाणपत्र
- जन्म तारख जाहीर करणारे मॅजिस्ट्रेट यांची सही असलेले प्रतिज्ञा पत्र
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेने जारी केलेले फोटो ओळखपत्र
- सरकारच्या आरोग्य योजनेचे कार्ड
नोट – जर पॅन कार्डसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा अल्पवयीन असेल तर वरील कागदपत्र हे त्याच्या पालकांचे किंवा त्या अल्पवयीन व्यक्तीची कागदपत्रे त्याच्या ओळखीचा पुरावा म्हणून देता येतात.
जर भारतीय नागरिक देशाच्या बाहेर राहत असेल तर पत्त्याचा पुरावा हा तो राहत असलेल्या देशातील बँकेच्या खात्याचे तीन महिन्यांचे स्टेटमेंट देऊन किंवा नॉन-रेसिडंट एक्सटर्नल (NRE) खात्याच्या स्टेटमेंटद्वारे दिला जाऊ शकते.
जर हिंदू अविभाजित कुटुंबा (HUF) चे प्रकरण असेल तर कुटुंबप्रमुख (कर्ता) याला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची नावे असलेले शपथपत्र सादर करावे लागते, ज्यामध्ये अर्जाच्या तारखे वेळी त्यांच्या वडीलांची नावे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे पत्ते द्यावे लागतात. याबरोबरच जन्म तारखेचा पुरावा आणि पत्ता याचा पुरावा तपासण्यासाठी कर्त्या व्यक्तीचे नाव असलेले वरील पैकी कोणत्याही एका कागदपत्राची प्रत द्यावी लागते.
परदेशी नागरिक/एनआरआय व्यक्तीला पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर कोणती कादगपत्रे आवश्यक आहेत?
HUFसदस्य असलेल्या व्यक्तीला खाली देण्यातील आलेल्या कागदपत्रांच्या प्रती पॅन साठी द्याव्या लागतील-
ओळखेचा पुरावा
- पासपोर्ट
- रेशन कार्ड
- रेन्शनर कार्ड
- केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र
- भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले वैध ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) कागदपत्र
पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मदतान ओळखपत्र
- बँक स्टेटमेंट (ज्या देशात तुम्ही राहत आहात तेथील किंवा भारतातील एनआरई खाते)
- पोस्ट ऑफिस पासबुक
- पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) कार्ड किंवा भारत सरकारने जारी केलेले ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड
- अर्जदाराचा पत्ता स्पष्टपणे नमूद असेल असे पोस्ट ऑफिस पासबुक
- डोमिसाईल प्रमाणपत्र
अल्पवयीन व्यक्तीच्या पॅन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
जर अर्जदार विद्यार्थी किंवा अल्पवयीन असेल तर पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे:
- आधार कार्ड
- वाहन चालविण्याचा परवाना
- पासपोर्ट
- गेल्या तीन महिन्यांचे बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
- वीज, गॅस, पाणी किंवा टेलिफोन बिल (तीन महिन्यांपेक्षा जास्त जुने नसावी)
- मतदार ओळखपत्र
- सरकारने दिलेले डोमिसाईल प्रमाणपत्र
- राजपत्रित अधिकारी किंवा आमदार यांनी साक्षांकित केलेले मूळ पत्त्याचे प्रमाणपत्र
- केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले अकॉमडेशन अलॉटमेंटचे पज्ञ
ओळखीचा पुरावा
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट
- वाहन चालविण्याचा परवाना
- रेशन कार्ड
- अधिकाऱ्यांनी दिलेले फोटो असलेले ओळखपत्र
- राजपत्रित अधिकारी किंवा आमदार यांनी साक्षांकित केलेले ओरिजनल ओळखपत्र
जन्म तारखेचा पुरावा
- आधार कार्ड
- जन्म तारीख प्रमाणपत्र
- पासपोर्ट
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र
- मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डाने दिलेले शैक्षणिक प्रमाणपत्र
- बरोबर जन्म तारीख असलेले आणि मॅजिस्ट्रेटसमोर सही केलेले प्रतिज्ञापत्र
कंपन्यांना पॅन कार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी भारतीय आणि परदेशी कंपन्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे
भारतीय कंपन्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
- रजिस्ट्रारने जारी केलेले कंपनीचे नोंदणी किंवा पार्टनरशीप दाखविणारे कायदेशीर कागदपत्र
- इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्र (कंपन्या आणि एलएलपींसाठी)
- चॅरिटी अथॉरिटीचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट ऑफ ट्रस्ट अॅग्रिमेंट
- चॅरिटी कमिशनर किंवा कोणत्याही सरकारी अथॉरिटीकडून मिळालेला ओळख आणि पत्त्याची पुष्टी करणारा करार किंवा नोंदणी प्रमाणपत्र.
विदेशी कंपनी
- भारतीय दूतावास, अपोस्टिल किंवा मान्यताप्राप्त बँक अधिकार्याने स्वाक्षरी केलेले, मूळ देशाचे कंपनी नोंदणीची कागदपत्रे.
- भारत सरकारने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र
- भारत सरकारने दिलेली भारतात कार्यालय सुरू करण्याची परवानगी किंवा मंजूरी
- भारतात नोंदणीकृत ट्रस्टला पॅन कार्ड हवे असेल तर त्याच्या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
- असोसिएशन ऑफ पर्सन (ट्रस्ट) ही एक यूनिट असते जी काही लोकांनी एकत्र येऊन तयार केली जाते आणि लाभार्थी किंवा लाभार्थींच्या वतीने मालमत्ता ताब्यात ठेवण्याची परवानगी असते. वेगवेगळे उद्देशांच्या आधारे ट्रस्ट अनेक वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाऊ शकते.
पॅनसाठी अर्ज करण्यासाठी ट्रस्टला खालील कागदपत्रे आवश्यक असतात –
ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
ट्रस्ट डीड
चॅरिटी कमिशनरांनी दिलेला नोंदणीचे प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
ट्रस्ट डीड
चॅरिटी कमिशनरांनी दिलेले नोंदणी प्रमाणपत्र