मुंबई: लघुउद्योगांच्या कर्जपुरवठ्यावर केंद्रीत बँकेतर वित्तीय कंपनी युग्रो कॅपिटल लिमिटेडने ‘प्रोफेक्टस’ या वित्तकंपनीच्या संपूर्ण अधिग्रहणासाठी विद्यमान भागधारकांशी समभाग खरेदी करार केल्याची गुरुवारी घोषणा केली.

हा एकंदर १,४०० कोटी रुपयांचा अधिग्रहण व्यवहार पूर्णपणे रोखीत करण्यात आला आहे आणि युग्रोने नुकत्याच उभारलेल्या भांडवलाचा यासाठी वापर केला जाणार आहे. या संपादनामुळे युग्रोच्या वार्षिक नफ्यात अंदाजे १५० कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज आहे. तसेच खर्चात ११५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

हा अधिग्रहण पूर्ण झाल्यावर प्रोफेक्टस ही युग्रोच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी बनणार आहे. अशा रितीने शून्य खर्चाशिवाय युग्रोला विस्तारीकरणाचे फायदे मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात राज्यात २८ शाखा आणि सुमारे ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यरत प्रोफेक्टसने मार्च २०२५ अखेर ३,४६८ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केलेले आहे. तिचे निव्वळ बुडीत कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण १.१ टक्के आहे. कंपनीचा सुरक्षित कर्जपुरवठा क्षेत्रातील पूरक व्यवसाय युग्रोच्या विदा आधारित अंडररायटींग व्यवसायाशी मिळताजुळता आहे, असे युग्रो कॅपिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शचिंद्र नाथ म्हणाले.