Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भगवान रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटामाटात पार पडली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हजारो लोक सहभागी झाले होते, त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी लोकांची मोठी रांग लागली आहे. एका रिपोर्टनुसार, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर येत्या ५ वर्षांत अयोध्या आणि आसपासच्या शहरांमध्ये दीड ते दोन लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो.

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ह्युमन कॅपिटल सास प्लॅटफॉर्म बेटरप्लेसने म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनामुळे येत्या चार ते पाच वर्षांत १,५०,००० ते २,००,००० लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. बेटरप्लेसचे सहसंस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी प्रवीण अग्रवाल म्हणाले की, याशिवाय अयोध्येत हॉटेल चेन, अपार्टमेंट युनिट्स, आरोग्य सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे, ज्यामुळे ५० हजार ते १ लाख तात्काळ नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

हेही वाचाः Union Budget 2024 : हलवा समारंभ संपन्न, दरवर्षी का साजरी केली जाते ही परंपरा?

बेटरप्लेसचा अंदाज आहे की, पुढील काही वर्षांत दरवर्षी ५ कोटी लोक अयोध्येला भेट देतील. येत्या काही महिन्यांत १-२ लाख पर्यटक येण्यास सुरुवात होईल, त्यामुळे १० हजार ते ३० हजार नोकऱ्या त्वरित निर्माण होतील. हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, पर्यटनाशी संबंधित कंपन्या यासारख्या प्रवास आणि पर्यटनाशी संबंधित क्षेत्रांना फायदा होणार आहे. याशिवाय अन्न आणि पेये, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, वैयक्तिक काळजी उत्पादने, आरोग्यसेवा, बँकिंग क्षेत्रांना फायदा होईल.

हेही वाचाः ५ वर्षांत १.२५ लाख कोटींचे २०० रोपवे प्रकल्प; नितीन गडकरींचं पर्वतोड्डाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिराच्या उद्घाटनापूर्वी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने अंदाज व्यक्त केला होता की, मंदिराच्या अर्थव्यवस्थेतून निर्माण होणारा व्यवसायाचा आकडा १ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. देशातील ३० शहरांमधून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर कॅटने ही आकडेवारी जाहीर केली आहे.