पीटीआय, नवी दिल्ली

जगभरात बड्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीची महासाथ आली असताना, कर सल्लागार सेवा क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी डेलॉइटने मात्र मागील तीन वर्षांत भारतातील नोकरभरतीत सुमारे ५० हजारांनी भर घातल्याचे शुक्रवारी जाहीर केले. या काळात कंपनीतील मनुष्यबळ दुपटीने वाढले आहे.

डेलॉइट टच तोहमात्सू इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञानाधारित वृद्धीसाठी कौशल्य विकासावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. मनुष्यबळ संसाधनामध्ये कंपनी गुंतवणूक करीत असून, देशाच्या उत्पादक क्षमतेत भर घालत आहे. कंपनीने उत्तर भारतातील शेतातील पालापाचोळा जाळण्याच्या समस्येवरील उपाय करणारा पथदर्शी प्रकल्पही पूर्णत्वास नेला आहे.

आणखी वाचा- नोकर कपातीनंतर ‘गूगल’चा पदोन्नतीसाठी आखडता हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेलॉइट भारतात शैक्षणिक संधी मिळवून देण्याचे कामही करीत आहे. डेलॉइट कृत्रिम प्रज्ञा (एआय) प्रबोधिनीच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील गुणवत्तेची पोकळी भरून काढत आहे. यासाठी आयआयटीच्या सहकार्याने तृतीय वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योग-विशिष्ट कौशल्ये आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर शिक्षित करून कार्यबलाची गुणवत्ता विकसित करण्यास मदत केली जाते.