भारतीय रिझर्व्ह बँकने २७ मे रोजी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICICI बँक आणि YES बँकेवर आर्थिक दंड ठोठावला आहे. सेंट्रल बँकेने आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपये आणि येस बँकेवर ९१ लाख रुपये दंड ठोठावला आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनी कंट्रोलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने मार्दर्शक तत्वांचे पालन केले नसल्याचा ठपका आरबीआय़ने ठेवला आहे. येस बँकेने ग्राहकांच्या सेवा, कार्यालयीन खात्यांशी निगडीत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. आरबीआयसमोर अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसंच झिरो बॅलन्स खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकेने शुल्क वसूल केले. तसंच कार्यालयीन खात्यांमधून बेकायदा कामे केली आहे. त्यामुळे आरबीआयने एस बँकेला दंड ठोठावला आहे. येस बँकेने २०२२ या वर्षात अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे. एवढंच नव्हे तर ग्राहकांच्या नावाने काही अंतर्गत खाती उघडून ती कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामुळे या बँकेला ९१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा >> आईच्या दुधाची विक्री नको, FSSAI ने ठणकावलं, नियम मोडल्यास उगारणार कारवाईचा बडगा

तर, आयसीआयसीआय बँक आणि अॅडवान्स संबंधित अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. बँकेने पूर्ण तपास न करता अनेक कर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला. आरबीआयला चौकशीमध्ये आयसीआयसी बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या. बँकेलने  काही प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता  याचं विश्लेषण न करता  कर्ज दिल्याचं समोर आलं होतं.  त्यामुळे आरबीआयने त्यांना १ कोटींचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा >> खनिज तेलाची जागतिक मागणी २०३४ पर्यंत दसपटीने वाढणार!  ‘गोल्डमन सॅक्स’चा आगामी दशकभरासाठी भविष्यवेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीएसईवर येस बँकेचा शेअर सोमवारी ०.०१० रुपयांनी वाढला. त्यामुळे हा शेअर २३.०४ रुपयांवर बंद झाला. तर आयसीआयसीआय बँकेचा शेअर २.१० रुपयांनी घसरुन ११२९.१५ रुपयांवर बंद झाला.