Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,७३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७६,९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७६,९४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,६६९ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,६६९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,७३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,६६९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,७३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,६६९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,७३० रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices on sunday maharashtra 7 may 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb
First published on: 07-05-2023 at 08:54 IST