Gold Silver Rate Today : सध्या देशभरात दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. खरेदीसाठी लोकांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच धनयत्रोदशीला लोक आवडीने सोने चांदी खरेदी करतात. त्या दिवसासाठी आतापासून लोक बुकींग करत आहे. तुम्हीही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा भाव जाणून घ्या. (latest gold and silver rates on October 23, 2024)

सोने चांदीचे दर (Gold Silver Rate)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,३२५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,९७०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत १००० रुपये आहे म्हणजेच चांदी ९९,९८० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. मंगळवारी चांदीचा दर १००,१८० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७८,८६० रुपये होता.

हेही वाचा : Adani Acquires Orient Cement : अदानी समूहाच्या ताब्यात ओरिएंट सिमेंट

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,१८८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,७५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१८८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१८८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१८८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७५० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ अर्थात देशभरात सर्वत्र सोन्याचे एकसमान दर लागू करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) मंगळवारी सांगितले.