Pan Card : पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणे खूप आवश्यक आहे. पॅन कार्डमध्ये एक १० अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. यामध्ये पॅन कार्ड धारकाची सर्व माहिती असते. तसेच त्याच्या आर्थिक व्यवहारांचे तपशीलही पॅन कार्डमध्ये असतात.

क खाते उघडण्यासाठी आणि बँकिंगशी संबंधित इतर आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा घालण्यासाठीही पॅन कार्ड असावे लागते. पॅन कार्डची वैधता आयुष्यभरासाठी असते. तुम्हाला ते वारंवार बनवून घ्यावे लागत नाही.

१ जानेवारी २०१७ रोजी आयकर विभागाने सुरू केलेल्या पॅन कार्डच्या नवीन फॉरमॅटनुसार, सर्व पॅन कार्डमध्ये कार्डधारकाची माहिती असलेला क्विक रिस्पॉन्स (QR) कोड असतो. हा कोड डेटा पडताळणीसाठी देखील वापरला जाऊ शकतो. त्यात कार्डधारकाचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख आणि स्वाक्षरी देखील असते.

पॅन कार्डसाठी किती शुल्क भरावे लागते?

नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी १०७ रुपये शुल्क भरावे लागते. त्यातील ९३ रुपये अर्ज शुल्क आणि १५% सेवा शुल्क याचा समावेश आहे. हे शुल्क नवीन अर्ज करण्यासाठी आणि पुनर्मुद्रण दोन्हीसाठी लागू आहे.

पॅन कार्ड शुल्काबद्दल तपशीलवार माहिती:

भारतीय नागरिकांना पॅन कार्ड काढायचे असल्यास त्यासाठी १०७ रुपये खर्च येतो. (अर्ज शुल्क ९३ रुपये + १५% सेवा शुल्क).

विदेशात पॅन कार्ड पाठवण्यासाठी १,०२० रुपये मोजावे लागतात. (अर्ज शुल्क + पैसे पाठवण्याचे शुल्क).

भारतात पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करून घेण्यासाठी करांसह ५० रुपये खर्च येतो.

तर भारताबाहेर पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करून घेण्यासाठी करांसह ९५९ रुपये खर्च येतो.

भारतात ई-पॅन काढण्यासाठी ६६ रुपये खर्च येतो. यात अर्ज शुल्क + जीएसटी दोन्हीचा समावेश आहे.

भारताबाहेर पॅन कार्डची प्रत पाठवण्यासाठी १,०११ रुपये खर्च येतो.

ई-पॅन कार्ड ईमेल आयडीवर पाठवण्यासाठी ७२ रुपये खर्च येतो.

पॅन कार्डमध्ये कोणती माहिती असते?

कार्डधारकाचे नाव – व्यक्तीचे नाव, फर्म किंवा कंपनी असेल तर त्याचे नाव.

कार्डधारकाच्या वडिलांचे नाव – वैयक्तिक कार्डधारकांसाठीच हे लागू आहे. वैयक्तिक पॅन कार्डवर वडिलांचे किंवा आईचे नाव (एकल पालक असल्यास) छापले जाते.

जन्मतारीख – वैयक्तिक कार्डधारकांच्या कार्डवर जन्मतारीख असते. तर, कंपनी किंवा फर्मच्या बाबतीत नोंदणीची तारीख लिहिलेली असते.

पॅन क्रमांक – हा १०-अंकी अल्फा-न्यूमेरिक नंबर आहे. यातील प्रत्येक अंक कार्डधारकाबद्दल माहिती देतो.

स्वाक्षरी – फक्त वैयक्तिक कार्डधारकांसाठी लागू. पॅन कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षरीचा पुरावा म्हणून देखील काम करते.

व्यक्तीचा फोटो – पॅन व्यक्तीचा फोटो ओळखीचा पुरावा म्हणून काम करतो. कंपन्या आणि फर्मच्या बाबतीत, कार्डवर कोणताही फोटो नसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॅन कार्ड मिळवण्यासाठी पात्रता

PAN Card Eligibility : सर्व भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) पॅन कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कंपन्या, फर्म, व्यक्तींची संघटना, हिंदू विभक्त कुटुंबे, तसेच सर्व खासगी संस्थादेखील पॅन कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. भारतात कर भरणाऱ्या आणि भारतात आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्वांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.