लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : लवकरच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) दरमहा २५० रुपये इतक्या कमी दराने सुरू करू शकतील, असे ‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी सोमवारी सीआयआयद्वारे आयोजित परिषदेतील एका सत्रादरम्यान स्पष्ट केले.

गुंतवणूक सुलभतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात त्या म्हणाल्या, भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढवण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ प्रस्तावाचे दस्त अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना अधोरेखित केली. तसेच, समावेशनाच्या महत्त्वावर भर देताना त्या म्हणाल्या की, उद्योगासाठी भांडवल निर्माण करणे आणि देशातील नागरिकांसाठी संपत्ती निर्माण करणे हे दोन्ही घटक नियामकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

आणखी वाचा-अर्थव्यवस्थेचे ‘अति-वित्तीयीकरण’ टाळण्याची गरज, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीकडून दाखल होणारे प्रकटन (डिस्क्लोजर) लवकरच दुसऱ्या शेअर बाजाराकडे आपोआप सादर केले जाईल. सध्या सारखे ते वेगवेगळे दाखल करण्याऐवजी एकल प्रकटनाची पद्धत लवकरच प्रत्यक्षात येईल, असेही बूच म्हणाल्या. सेबीचे माजी पूर्णवेळ सदस्य, एस. के. मोहंती यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशींवर आधारित नुकतेच प्रकटीकरण तसेच सूचिबद्ध कंपन्यांनी पालन करावयाच्या नियमांमध्ये व्यापक बदलांना प्रत्यक्षरूप दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.