रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने तातडीच्या वेळेस जलद व्यवहार होण्यासाठी (lightweight payments system) पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालीची संकल्पना तयार केली आहे. ही प्रणाली डिजिटल पेमेंट्सला समतुल्य असून, तिला “बंकर” म्हणतात, जी नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अगदी कमीत कमी कर्मचार्‍यांद्वारे कुठूनही चालविली जाऊ शकते. या प्रणालीची पायाभूत सुविधा UPI, NEFT आणि RTGS यांसारख्या विद्यमान पेमेंट प्रणालींना अधोरेखित करणाऱ्या तंत्रज्ञानापासून वेगळी असते. परंतु मध्यवर्ती बँकेने अद्याप ही पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी वेळ निश्चित केलेली नाही.

तातडीच्या वेळेस जलद व्यवहार होण्याच्या प्रणालीची आवश्यकता का?

मंगळवारी (३० मे) रोजी २०२२-२३ च्या वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. तातडीच्या वेळेत जलद व्यवहार करणारी ही प्रणाली किमान हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर ऑपरेट करणे अपेक्षित असून, ती फक्त “गरजेच्या आधारावर” सक्रिय केली जाणार असल्याचंही RBI च्या अहवालात म्हटले आहे. सरकार आणि बाजाराशी संबंधित व्यवहारांसारख्या अर्थव्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे असे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ती उपयुक्त ठरणार असल्याचंही आरबीआयनं अधोरेखित केले आहे.

Capital Gains, Taxability, Sale of Mutual Fund, Capital Gains Sale of Mutual Fund Units, equity mutual fund, small cap mutual fund, large cap mutual fund, mid cap mutual fund, date mutual fund, systematic investment planning, tax on mutual fund profit, money mantra, finance article marathi,
Money Mantra: म्युच्युअल फंडाच्या युनिट्स विक्रीपश्चात होणारा भांडवली नफा व करदायीत्व
temperature affect the battery of mobile phones
विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…
upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?

नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या वेळी अंतर्निहित माहिती आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधा थांबवून या पेमेंट सिस्टम तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात, असंही आरबीआयकडून सांगण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि युद्धसदृश परिस्थितीत महत्त्वाच्या व्यवहारांसाठी ही पेमेंट सिस्टम चालवता येणार आहे. युद्धाच्या प्रसंगी बंकर जसे काम करतात, तसंच काहीसं काम या पेमेंट सिस्टमद्वारे केले जाणार आहे. यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डिजिटल पेमेंट आणि आर्थिक बाजारपेठेतील पायाभूत सुविधांवर लोकांचा विश्वास वाढेल,” असंही आरबीआयचं म्हणणं आहे.

तातडीच्या वेळेस जलद व्यवहार करणारी प्रणाली UPI पेक्षा वेगळी कशी?

सध्या देशात व्यवहार करण्यासाठी अनेक पेमेंट सिस्टम उपलब्ध आहेत, ज्या प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. RTGS, NEFT आणि UPI यांसारख्या विद्यमान पारंपरिक पेमेंट सिस्टम व्यवहार हाताळण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत, परंतु तातडीच्या वेळेस जलद व्यवहार करण्यासाठी मदतगार ठरणारी ही प्रणाली इतर प्रणालींपेक्षा वेगळी असेल, असंही आरबीआयचं म्हणणं आहे. परिणामी, ही प्रगत प्रणाली आयटी पायाभूत सुविधांद्वारे तयार केलेल्या वायर्ड नेटवर्कवर अवलंबून आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि युद्धादरम्यान पायाभूत सुविधांवर बऱ्याचदा परिमाण होतो, अशा परिस्थितीत ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहेत.