मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीच्या सलग सहा दिवस सुरू राहिलेल्या उच्चांकी विजयपथाने बुधवारी गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीने उलट दिशेने वळण घेतले. सत्रारंभी नव्या उच्चांकाच्या दिशेने सरसावलेले निर्देशांक दिवस सरताना अर्धा टक्क्याहून अधिक घसरणीसह स्थिरावले.

दिवसांतर्गत व्यवहारांतर्गत अधिकतर एका स्थिर पातळीवर राहिलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स, दिवसअखेरीस ४३४.३१ अंशांनी (०.५९ टक्के) गडगडून ७२,६२३.०९ वर स्थिरावला. ७३,०५७.४० अंशांच्या मागील बंद पातळीपेक्षा तो दिवसांतर्गत ०.८३ टक्क्यांनी घसरून ७२,४५०.५६ या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. बरोबरीने, निफ्टी निर्देशांकही १४१.९० अंश (०.६४ टक्के) घसरून २२,०५५.०५ अंशांवर दिवसअखेरीस बंद झाला. मंगळवारच्या सत्रात या निर्देशांकाने २२,१९६.९५ अंशांचे ऐतिहासिक शिखर गाठले होते आणि बुधवारच्या सत्रातही बहुतांश वेळ तो वरच्या पातळीवरच हलताना दिसून आला, मात्र मुख्यत्वे शेवटच्या काही तासांच्या व्यवहारात निर्देेशांकाने कमावलेले सर्व काही गमावले. सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभागांना घसरणीचा फटका बसला तर निफ्टीतील ५० घटकांपैकी ३७ समभागांनी तोट्यासह सत्राची अखेर केली.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

हेही वाचा >>> ‘झी’मधील आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा विस्तार; ‘सेबी’कडून कंपनीच्या अनेक माजी संचालकांना समन्स

सेन्सेक्समध्ये एनटीपीसीला सर्वाधिक तोटा झाला आणि २.७१ टक्क्यांच्या घसरणीसह तो बंद झाला. त्यानंतर पॉवरग्रिड, विप्रो, एचसीएल टेक, एल अँड टी आणि टेक महिंद्र असा घसरणीचा क्रम राहिला. याउलट टाटा स्टील (१.९९ टक्के), स्टेट बँक (१.५१ टक्के), जेएसडब्ल्यू स्टील आणि इंडसइंड बँक सकारात्मक वाढीसह बंद झाले.

भारतीय भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकाचे मूल्यांकन महत्त्वपूर्ण अधिमूल्य राखून आहे, ज्यामुळे एकंदर लाभ-जोखीम समीकरण प्रतिकूल बनले आहे. ज्यामुळे एकीकडे नफा पदरी पाडून घेण्यास गुंतवणूकदारांना प्रवृत्त केले जात आहे आणि पर्यायाने बाजाराला वरच्या स्तरावर कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीच्या इतिवृत्तान्ताच्या प्रतीक्षेमुळे सावध पवित्रा घेतलेल्या जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांच्या कलानेही स्थानिक बाजारावर नकारात्मक प्रभाव साधला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. फेडकडून लवकरात लवकर व्याजदर कपातीचे चक्र सुरू होण्याची आस असताना, जानेवारीत अपेक्षेपेक्षा जास्त नोंदवला गेलेला तेथील महागाई दरामुळे ही अपेक्षा धोक्यात आल्यानेही चिंता वाढली आहे, असेही नायर यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 21 February 2024: सोने किमतीबाबत मोठी अपडेट, चांदीच्या दरात वाढ, मुंबई-पुण्यात भाव काय?

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अधिक घसरण

व्यापक बाजारात घसरणीची व्याप्ती बुधवारी अधिक मोठी दिसून आली आणि याचा प्रत्यय बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातील अनुक्रमे १.२७ टक्के आणि ०.८४ टक्क्यांच्या घसरणीने दिला. त्या उलट लार्ज कॅप निर्देशांकातील घसरणीचा मात्रा तुलनेने कमी ०.५९ टक्क्यांची होती. विश्लेषकांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातील घसरणीचे श्रेय अमेरिकी फेडच्या जाहीर होऊ घातलेल्या इतिवृत्तान्तातील समालोचनाबाबत साशंकतेला आणि परिणामी अस्थिरतेपायी गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेला दिले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अपवाद रूपात, केवळ ‘बीएसई रिॲल्टी’ (स्थावर मालमत्ता) निर्देशांक १.९६ टक्क्यांच्या वाढीसह बुधवारी बंद झाला.