मुंबई : रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. चाकरमान्यांचे गावी जाण्याचे प्लॅन सुरू आहे. मात्र या सणोत्सवाच्या काळात तिकिटांचे दर गगनाला भिडतात. म्हणूनच देशातील अग्रगण्य मोबाईल पेमेंट आणि वित्तीय सेवा वितरण कंपनी आणि मोबाईल पेमेंट्स, क्यूआर कोड्स आणि साउंडबॉक्सचे प्रणेते पेटीएमने ‘पेटीएम ट्रॅव्हल मेगा फेस्टिव्हल सेल’ जाहीर केला आहे. या सेलमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीसारख्या सणांपूर्वी फ्लाइट आणि बस बुकिंगवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

पेटीएम ट्रॅव्हल मेगा फेस्टिव्हल सेल ३१ जुलै २०२५ पर्यंत सुरू झाला आहे आणि याचा उद्देश सणासुदीच्या काळात कुटुंब भेटी, लांब विकेंड ट्रिप्स किंवा सुट्ट्यांच्या योजनांसाठी प्रवास अधिक सुलभ, आरामदायी आणि परवडण्याजोगे बनवण्याचा आहे. कंपनीने बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आणि आरबीएल बँक यांसारख्या आघाडीच्या बँकांसोबत भागीदारी केली आहे.

बँकांकडून किती डिस्काऊंट?

बँक ऑफ बडोदा कार्डधारकांना देशांतर्गत फ्लाइटवर १२ टक्के सूट, आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर १० टक्के सूट आणि बस तिकिटांवर २० टक्के सूट मिळेल. आयसीआयसीआय बँक कार्डधारकांना देशांतर्गत फ्लाइटवर १२ टक्के आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर १० टक्के सूट मिळेल. आरबीएल बँक ग्राहकांसाठी देशांतर्गत फ्लाइटवर १२ टक्के आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर १० टक्के सूट उपलब्ध आहे.

फ्री कॅन्सलेशन पर्याय

जे प्रवासी ट्रेनने प्रवास करणार असतील आणि पेटीएमद्वारे बुकिंग करतात, त्यांना यूपीआयद्वारे पेमेंट करताना शून्य पेमेंट गेटवे शुल्काचा लाभ मिळतो. अधिक लवचिकता देण्यासाठी, प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या ट्रेन बुकिंगसाठी तत्काळ तिकिटांसह १०० टक्के झपाट्याने मिळणारा परतावा देणारे फ्री कॅन्सलेशन पर्यायही देण्यात आले आहे.

इतर सुविधा काय?

प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी, कंपनी वापरकर्त्यांना लाईव्ह ट्रेन रनिंग स्टेटस, पीएनआर अपडेट्स मिळवण्याची सुविधा तसेच टिकिट अश्युअर सेवा उपलब्ध करून देते. ही सेवा प्रवाशांना जवळच्या स्थानकांमधून, कनेक्टिंग ट्रेन रूट्स आणि लवचिक प्रवास तारखांमधून पर्याय देत निश्चित तिकिटे मिळवण्यासाठी मदत करते. सण म्हणजे कुटुंबीयांना एकत्र आणण्याचा काळ असतो आणि प्रवास हे त्या पुन्हा भेटीचे महत्त्वाचे माध्यम असते. पेटीएम ट्रॅव्हल मेगा फेस्टिव्हल सेलच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आगामी लांब विकेंडचा आनंद लुटण्याची संधी देतोय तीही जबरदस्त सवलत आणि सुरक्षित बुकिंगसह अनुभव देत आहे, असे पेटीएम ट्रॅव्हलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मोफत प्रवास विमा

पेटीएम ट्रॅव्हलने अलीकडेच ट्रॅव्हल पास ही सब्स्क्रिप्शन आधारित सेवा सुरू केली आहे, जी वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बचत आणि सोयीसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या पासमध्ये मोफत कॅन्सलेशन आणि मोफत प्रवास विम्याचा समावेश आहे, जे प्रवाशांसाठी हे अधिक किफायतशीर बनवते.

कंपनीने अगोडा सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्ते पेटीएम अ‍ॅपवर हॉटेल्स बुक करू शकतात आणि भारतासह आंतरराष्ट्रीय स्थळांवर अगोडाच्या विस्तृत निवासांचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय फ्लाय९१ सोबतच्या सहकार्यामुळे भारतातील महत्त्वाच्या प्रादेशिक मार्गांवर फ्लाइट बुकिंगसुद्धा उपलब्ध आहे.