Anand Mahindra Daughters : महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर आणि तरुणांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. लोकांना आनंद महिंद्रा यांची काम करण्याची पद्धत खूपच आवडते. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि वेळोवेळी उत्तम पोस्ट शेअर करीत असतात. आनंद महिंद्रा यांचा जन्म १ मे १९५५ मध्ये झाला. आनंद महिंद्रा आपल्या व्यवसायाबद्दल इतके जागरूक आहेत की, ते फक्त महिंद्राचीच वाहने वापरतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, जर ते स्वतः त्यांच्या कंपनीच्या गाड्या वापरत नसतील तर त्यांचे ग्राहक कसे वापरतील? आनंद महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे व्यवस्थापन करीत आहेत, ज्याचे बाजारमूल्य १.९ लाख कोटी आहे, तसेच फोर्ब्स २०२३ च्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती २.६ अब्ज डॉलर आहे. परंतु त्यांच्यानंतर महिंद्राची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न लोकांच्या मनात नक्कीच निर्माण होत आहे. Anand Mahindra

आनंद महिंद्रा यांच्या मुली काय करतात?

आनंद महिंद्रा यांना दिव्या आणि अलिका या दोन मुली आहेत. त्यांची मुलगी दिव्या हिने न्यू स्कूलमधून बॅचलर डिग्री मिळवली आहे. तिच्याकडे डिझायनिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री आहे. २००९ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने फ्रीलान्सर म्हणून काम केले. २०१५ मध्ये ती व्हर्व मॅगझिनमध्ये सामील झाली. ती तिथे कला-दिग्दर्शक (art director) म्हणून काम करते .

मुली परदेशात राहतात

दिव्याने न्यूयॉर्कमध्ये राहणारे मेक्सिकन वंशाचे कलाकार डोरडे झापाटाशी लग्न केले आणि अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांची दुसरी मुलगी अलिकाने फ्रेंच नागरिकाशी लग्न केले. आनंद महिंद्रा यांच्या पत्नी अनुराधा मॅन्स वर्ल्ड या मासिकाच्या संस्थापक आणि संपादक आहेत. त्यांची मोठी मुलगी दिव्या मासिकाची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे आणि धाकटी मुलगी अलिका या मॅगझिनची संपादकीय संचालक आहे.

हेही वाचाः इस्रायल-हमास युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, एका झटक्यात ५ टक्क्यांनी वधारल्या

मुलींचा भारतीय रीतीरिवाजानुसार विवाह

आनंद महिंद्रा यांनी आपल्या मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. आनंद महिंद्रा यांनी कधीही आपल्या मुलींवर कौटुंबिक व्यवसायात येण्यासाठी दबाव आणला नाही. लग्नासाठी त्यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते. त्यांनी आपल्या मुलींचे लग्न त्यांच्या आवडीच्या मुलांशी भारतीय परंपरेनुसार केले, ज्याची खूप चर्चा झाली. आनंद महिंद्रा यांच्या मुली परदेशात राहतात आणि त्यांना महिंद्राच्या व्यवसायात फारसा रस नाही.

हेही वाचाः DGGI ने अनिल अंबानींच्या कंपनीला ९२२ कोटींची पाठवली GST नोटीस

महिंद्राच्या व्यवसायात मुली का नाहीत?

आनंद महिंद्रा यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी नेहमीच त्यांच्या मुलींना त्यांच्या आवडीनुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिलं आहे. एक किस्सा सांगताना ते म्हणाले की, शेअरहोल्डरच्या बैठकीत त्यांना विचारण्यात आले की त्यांच्या मुली व्यवसायाचा भाग का नाहीत. आनंद महिंद्रा म्हणाले की, त्यांच्या मुली कौटुंबिक व्यवसायाचा भाग आहेत आणि त्यांच्या पत्नीबरोबर काम करीत आहेत. ते म्हणाले की, मी महिंद्रा अँड महिंद्राला कौटुंबिक व्यवसाय मानत नाही.

महिंद्रा हा कौटुंबिक व्यवसाय नाही

ते म्हणाले की, त्यांच्या आजोबांनी १९४५ मध्ये देशभक्तीपर कृती म्हणून कंपनी सुरू केली होती. त्यांनी आपल्या व्यवसायाकडे जनतेच्या पैशाचे रक्षक म्हणून पाहिले. त्यामुळे ते महिंद्रा अँड महिंद्राकडे कौटुंबिक व्यवसाय म्हणून पाहत नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरात मुले त्यांच्या इच्छेनुसार काहीही करण्यास मोकळी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्रा यांची पत्नी काय करते?

आनंद महिंद्रा यांच्या पत्नीचे नाव अनुराधा महिंद्रा आहे. मॅन्स वर्ल्ड या प्रसिद्ध मासिकाच्या त्या संस्थापक आहेत. हिंदू कुटुंबात जन्मलेल्या अनुराधा यांचे पालनपोषण मुंबईत झाले. कॉलेजमध्ये त्यांची भेट आनंद महिंद्रा यांच्याशी झाली. आनंद महिंद्रा यांनी अनुराधाला त्यांच्या आजीची अंगठी देऊन फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. अनुराधा यांनी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. अनुराधा कॅमेरा आणि लाईमलाईटपासून दूर राहतात.