विल्यम शार्प हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ आपल्याला परिचित आहे. मागील आठवड्याच्या लेखात गणितज्ञ असलेल्या व्यक्तीने बाजारात जी मोलाची भर घातली त्याची आपण माहिती घेतली. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा बाजाराच्या वाढीसाठी विविध संकल्पना आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणून अर्थशास्त्रज्ञांचे सुद्धा बाजारात योगदान आहे. त्यापैकी विल्यम शार्पची आणि त्यांच्या कामाची थोडक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.

शार्प यांचा जन्म बोस्टन येथे झाला. त्यांचे शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस या ठिकाणी झाले. या अगोदर अर्थशास्त्र या शास्त्राला स्वतंत्र मान्यता नव्हती. राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयाचा एक छोटा भाग म्हणूनच अर्थशास्त्र ओळखले जात होते. त्यामुळे वित्तीय अर्थशास्त्र हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होणे दुरापास्तच होते. परंतु पुढे १९६१ ला शार्पला डॉक्टरेट मिळवता आली, त्या अगोदर त्याने रॅण्ड कॉर्पोरेशन या कंपनीत काही काळ नोकरी केली होती. अर्थशास्त्र शिकविण्याचे काम युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, सिएटल या ठिकाणी १९६१ ते ६८ या काळात त्याने केले. तर १९७० पासून स्टॅण्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी केली.

हेही वाचा…निफ्टीतील सहस्रांशाच्या वाढीत, निवडक पाच समभागांचे ७५ टक्के योगदान

गुंतवणूकविषयक सल्ला देणारी ‘शार्प रसेल रिसर्च’ ही पहिली संस्था आणि नंतर ‘विल्यम एफ शार्प असोसिएट्स’ ही संस्था १९८० ला त्यांनी सुरू केली. १९९३ ला पुन्हा प्रोफेसर, १९९६ ला एमिरेट्स तर १९९६ ला पोर्टफोलिओविषयक सल्ला देणारी कंपनी सुरू केली.

‘पैसे कमावण्यासाठी मी बाजारात आलो,’ असे त्याने आपले उद्दिष्ट स्पष्ट केले होते. त्यासाठी भांडवल बाजाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये त्याने प्रशिक्षण घेतले, पण ते प्रशिक्षण त्याला फारसे उपयोगी वाटले नाही. त्यांचा जो मुख्य आवडीचा विषय होता, अर्थशास्त्र या विषयाची छाया किंवा छाप प्रशिक्षणात कुठेही जाणवली नाही. म्हणून त्याने जे फीड वेस्टर्न या संस्थेत विश्लेषक म्हणून सुरुवात केली. परंतु ती संस्था गुंतवणूकीच्या क्षेत्रात कार्यरत नव्हती, तर त्यांचे लक्ष्य कंपनी फायनान्स यावर होते. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे समाधान झाले नाही. पुढे १९९० ला मार्कोविज आणि एच. मीलर यांच्याशी आलेल्या संबधातून या तिघांनी कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेल तयार केले आणि या त्यांच्या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळाले.

हेही वाचा…विराट कोहली- अनुष्का शर्मा झाले मालामाल! शेअर बाजारात ‘या’ हुशारीने झटक्यात कमावले १० कोटी रुपये, कसा झाला फायदा?

नोबेल पारितोषिक कोणा कोणाला मिळाले त्यांची माहिती आणि त्यात पुन्हा बाजाराशी संबंधित विषयाची निवड करून त्यात सखोल संशोधन करून नोबेल पारितोषिक मिळवलेल्या शास्त्रज्ञांची नावे खालीलप्रमाणे आहेत आणि त्यांचे विषय कोणते होते हे बघणे सुद्धा उदबोधक ठरेल.
१) १९८१ ला जेम्स टॉबीन या अमेरिकी अर्थशास्त्रज्ञाला पोर्टफोलिओ सिलेक्शन थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट.

२) १९८५ फ्रँको मॉर्डर्जिनी पुन्हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ. विषय ॲनालिसिस ऑफ हाऊसहोल्ड सेविंग्ज अँड फायनाशियल मार्केट
३) १९९० हॅरी एन. मार्कोवीज, अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, मिर्टान एच मिलर हा दुसरा अर्थशास्त्रज्ञ आणि विल्यम एफ शार्प हा तिसरा अर्थशास्त्रज्ञ. या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचा विषय होता ‘स्टडी ऑफ फायनाशियल मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेंकिंग.’

४) १९९७ रॉबट्स सी मेरटॉन, अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ. मेथड फॉर डिटरमायनिंग दि व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑप्शन अँड डेरिव्हेटिव्ह्ज
५) २००१ मायरॉन एस शोल्स, जॉर्ज ए एकलॉफ, मायकेल स्पेन्स आणि जोसेफ स्टिगलिट्ज, ॲनालिसिस ऑफ मार्केट्स विथ सिस्टीमॅटिक इन्फर्मेशन .

अर्थशास्त्राला आणि विशेषत: वित्तीय अर्थशास्त्राला या कालावधीत जगात मान्यता मिळू लागली होती. यामुळे विल्यम शार्प याने बाजारात महत्त्वाची भर घातली आणि म्हणून त्याला ‘बीटाचा जन्मदाता’ असे म्हटले जाते. पुढे अनेकांनी या थिअरीचा उपयोग केला. आणि शेअरची वध-घट आणि शेअर निर्देशांकाची वध-घट यांचा संबंध जोडला गेला, आणि त्यांचा संबंध गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओची एकूण कामगिरी विचारात घेता, परतावा मिळाला परंतु तो परतावा मिळवून देण्यासाठी किती जोखीम घेतली आणि ही जोखीम योग्य आहे का? या संकल्पनेचा अभ्यास पुढे बाजारात तसेच बाजारावर अवलंबून असणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांची कामगिरी आणि ती कामगिरी दाखविण्यासाठी जी जोखीम घेतली ती योग्य होती की नाही याचा अभ्यास करणे सुरू झाले.

हेही वाचा…बीएसई सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला ७५,३०० टप्पा, आज १,१०० अंकाची विक्रमी वाढ

शार्प याने पीटर लिंच याने ज्या योजनेचे निधी व्यवस्थापन केले होते आणि त्याबद्दल लिंचचा जो गवगवा झाला होता, त्यावरसुद्धा टीका केली होती. म्युच्युअल फंड योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापकांचे कौशल्य सक्रिय आणि निष्क्रिय व्यवस्थापक असणाऱ्या योजना (मराठी शब्द वापरण्याऐवजी ॲक्टिव्ह किंवा पॅसीव्ह फंड्स हे शब्द जास्त चांगले समजतील) यावर सुद्धा टीकाटिप्पणी केली. बाजारात मूल्य (व्हॅल्यू) विरुद्ध वृद्धी (ग्रोथ) हा कायमचा संघर्ष आहे. त्यामध्ये शार्प यांचे असे मत होते की, व्हॅल्यू स्टॉक्स यांनी ग्रोथ स्टॉक्स यांच्यावर मात केलेली आहे. परंतु त्यासाठी त्यांना काही कालावधी द्यावा लागतो. आणि हे कायमस्वरूपी मात करतील का हा पुन्हा वादाचा विषय आहे. आणि त्यासाठी पुन्हा किती कालावधी दिला जातो हे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून गुंतवणूकशास्त्रात एक संकल्पना कायम अस्तित्वात राहील असे अजिबात नाही. कधी कधी तर असाही अनुभव येतो की, ग्रोथ स्टॉक पेक्षा व्हॅल्यू जास्त जोखमीचे ठरतात.

हेही वाचा…निफ्टीतील सहस्रांशाच्या वाढीत, निवडक पाच समभागांचे ७५ टक्के योगदान

शार्प याने काही पेन्शन फंड्सचे व्यवस्थापन केले. त्यामध्ये कॅलिफोर्निया पब्लिक एम्पलॅाईज रिटायरमेंट सिस्टीम (कॅल्पर्स) याचा उल्लेख करायला लागेल .

गुंतवणूकीच्या शास्त्रात विल्यम शार्प हे नाव कायम राहील ते १९६४ ला त्याने प्रसिद्ध केलेल्या ‘कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेल’मुळे. एकूण बाजाराशी एखाद्या शेअर्सचा काय संबंध असतो आणि त्याचे मोजमाप कसे केले जाते, आणि सर्वात महत्त्वाचे जर शेअरमध्ये, बाजारापेक्षा जास्त आकर्षक कामगिरी करून दाखविण्याची इच्छा असेल तर जास्त जोखीम घ्यावीच लागते. या शक्यतेला ‘बीटा’ असे नामाभिधान देऊन, गुंतवणूक विश्वाच्या संकल्पनेत आणि शब्दसंग्रहात त्यांनी मोलाची भर घातली. बाजाराला ‘बीटा’ मिळवून देणारा हा अर्थशास्त्रज्ञ त्याच्या ‘शार्प रेशो’मुळे देखील चिरस्मरणीय निश्चितच राहील .