देवदत्त धनोकर

प्रत्येकाला एका नियमित उत्पन्नाची गरज असते. त्यासाठी सुरक्षित आणि जोखीमशून्य मार्ग म्हणजे पोस्टाची मासिक उत्पन्न योजना उपयुक्त ठरते. अर्थात या योजनेत काही गुंतवणुकीच्या मर्यादा आहेत. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे महागाईवाढीचा विचार करता मिळणारे व्याज उत्पन्न खूपच कमी आहे. साहजिकच माहागाईवर मात करण्यासाठी आपल्या आर्थिक नियोजनात पोस्टाच्या योजनेसोबतच म्युच्युअल फंडाच्या योजनेचा समावेश करणे योग्य ठरेल. आजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करून नियमित उत्पन्न कसे मिळवावे याची माहिती घेऊया.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

म्युच्युअल फंडातून उत्पन्न मिळवण्याची सामान्यतः पद्धत म्हणजे म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करून लाभांश (डिव्हिडंड) पर्याय निवडणे. या प्रकारचे नियोजन केले तर म्युच्युअल फंड योजनेने लाभांश दिल्यावर उत्पन्न मिळते. अर्थात या योजनेच्या काही मर्यादादेखील आहेत त्यांची माहितीदेखील गुंतवणूकदारास असणे आवश्यक आहे .

१) दरमहा / दरवर्षी लाभांश उत्पन्न मिळेलच याची खात्री नसते. शिवाय योजनेत नफा झाला तरच लाभांश दिला जातो.

२) लाभांशाची रक्कम निश्चित नसते.

३) लाभांशाची रक्कम करपात्र आहे.

मासिक खर्च भागवण्यासाठी नियमित उत्पन्नाची गरज आहे किंवा ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंडाच्या वृद्धी (ग्रोथ) पर्यायात गुंतवणूक करून ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन’ म्हणजेच ‘एसडब्लूपी’च्या मदतीने दरमहा उत्पन्न मिळवणे अधिक फायदेशीर ठरते.

हेही वाचा >>> Money Mantra: डेकोय प्राइसिंग आणि चॉइस आर्किटेक्चर काय असतं?

‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन’ म्हणजे काय?

गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असणाऱ्या ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक आपल्या सर्वानाच माहिती आहे, यात आपल्या बँकेतून ठरावीक रक्कम, ठरावीक तारखेला, ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेत जमा होते. त्याचप्रमाणे अगदी उलट म्हणजेच ‘एसडब्लूपी’मध्ये ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेतून, ठरावीक रक्कम, ठरावीक तारखेला आपल्या बँकेत जमा होते. ‘एसआयपी’च्या विरुद्ध कार्यपद्धती एसडब्लूपीची असते. ज्यावेळेस आपल्याला नियमित उत्पन्नाची गरज असते, त्यावेळेस ‘एसडब्लूपी’मार्फत आपण दरमहा पैशांचा नियमित स्रोत निर्माण करू शकता. म्हणजेच म्युच्युअल फंडाच्या वृद्धी पर्यायात गुंतवणूक करून दरमहा ठरावीक रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा गुंतवणूकदारांना यामध्ये मिळते. म्युच्युअल फंड कंपनीकडून दरमहा आवश्यक युनिट्सची विक्री करून रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

‘एसडब्लूपी’चे फायदे

१) दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळण्याची हमी.

२) आवश्यकतेनुसार उत्पन्नाची रक्कम ठरवण्याची संधी.

३) कराचा विचार करता लाभांश पर्यायांपेक्षा अधिक फायदेशीर

‘एसडब्लूपी’च्या मर्यादा

१) गुंतवणुकीची मूळ रक्कम कमी होऊ शकते. दरमहा युनिटची विक्री करून उत्पन्न देण्यात येते. साहजिकच जर योग्य नियोजन केलेले नसेल तर गुंतवणुकीची मूळ रक्कम कमी होण्याची शक्यता असते.

२) जर सुरुवातीच्या काळात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली, तर मूळ गुंतवणुकीचे मूल्य खूपच कमी होऊ शकते.

एका उदाहरणाच्या मदतीने आपण लाभांश योजनेच्या मदतीने केलेले नियोजन आणि ‘एसडब्लूपी’च्या मदतीने केलेले नियोजन यातील फरक जाणून घेऊ.

हेही वाचा >>> Money Mantra: मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये जोरदार ‘रॅली’

राकेश आणि त्याचा मित्र कार्तिक यांनी २०१३ मध्ये म्युच्युअल फंडाच्या लाभांश आणि वृद्धी पर्यायात सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी प्रत्येकी १५ लाखांची गुंतवणूक केली. २०२३ साली त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आणि अपेक्षित निवृत्तीची वेतन आपण जाणून घेऊ.

                                      राकेश                                     कार्तिक

गुंतवणुकीची तारीख              १ सप्टेंबर २०१३                         १ सप्टेंबर २०१३

गुंतवणूक रक्कम             १५ लाख                                     १५ लाख

गुंतवणूक पर्याय             लाभांश                                     वृद्धी

वर्ष २०२३ मध्ये गुंतवणूक मूल्य १८.३० लाख                         ५७.४० लाख

१० वर्षात मिळालेला लाभांश १६.५८ लाख                                    ०

१ सप्टेंबर २०२३ रोजी गुंतवणुकीत केलेला बदल – कोणताही बदल नाही – ३५,००० हजारांचे ‘ एसडब्लूपी’

दरमहा / वार्षिक अपेक्षित उत्पन्न – वार्षिक१.८० लाख             – दरमहा ३५ हजार वार्षिक / ४.२० लाख

दरमहा खात्रीशीर उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य नाही                         होय

राकेश आणि कार्तिक यांनी समान रकमेची गुंतवणूक केली होती. मात्र राकेशने नोकरीच्या काळातदेखील लाभांश उत्त्पन्न मिळवले. मिळणाऱ्या रकमेची पुनर्गुंतवणूक न केल्यामुळे राकेशला कार्तिकच्या तुलनेत कमी रक्कम सेवानिवृत्तीसाठी उपलब्ध झाली. कार्तिककडे सेवानिवृत्तीसाठी राकेशपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध असल्यामुळे कार्तिकला राकेशपेक्षा जास्त निवृत्ती रक्कम मिळेल तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार अधिक निधी मिळवण्याची सुविधा देखील कार्तिकला उपलब्ध आहे.

सेवानिवृत्तीनंतर ‘एसडब्लूपी’च्या मदतीने नियमित उत्पन्न कसे मिळवाल?

तरुणवयातच समभाग संलग्न म्युच्युअल फंडाच्या वृद्धी पर्यायात नियमित गुंतवणूक करावी. निवृत्तीनंतर ‘एसडब्लूपी’च्या मदतीने युनिटची विक्री करून उत्पन्न मिळवावे. दर २-३ वर्षांनी आर्थिक सल्लगारासोबत चर्चा करून ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल’ची रक्कम वाढवावी. उदा. २०२३ ते २०४३ अशी वीस वर्षे दरमहा ४०,००० रुपयांची समभाग संलग्न आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर २०४३ मध्ये गुंतवणुकीचे मूल्य साधारणपणे ४ रुपये कोटी असेल. २०४३ सालापासून दरमहा २ लाख रुपये ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल’च्या मदतीने बँक खात्यात जमा करण्याची सूचना देता येईल. २०४६ साली महागाईवाढ लक्षात घेऊन ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल’च्या रकमेत वाढ करून २ लाख ३० हजार करता येईल. याप्रमाणे वार्षिक आढावा घेऊन निवृत्तीच्या रकमेत वाढ करता येईल.

थोडक्यात महत्त्वाचे – म्युच्युअल फंडाची लाभांश योजना आणि‘एसडब्लूपी’ या दोन्ही पर्यायात फायदे तसेच काही मर्यादा आहेत. असे असले तरीही तज्ज्ञांच्या मदतीने योग्य नियोजन करून ‘एसडब्लूपी’च्या मदतीने आर्थिक उत्पन्न मिळवणे अधिक फायदेशीर ठरते.

लेखक पुणेस्थित व्याख्याते आणि आर्थिक प्रशिक्षक आहेतdgdinvestment@gmail.com