म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीचा अर्थात ‘एसआयपी’बद्दल आपण मागील लेखात माहिती घेतली. त्यांनतर अनेक वाचकांनी लेख आवडल्याचे आवर्जून कळवले आणि काही प्रश्नदेखील विचारले. आजच्या लेखात आपण ‘एसआयपी’बद्दल अधिक माहिती तसेच वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

‘एसआयपी टॉप-अप’ म्हणजे काय ?

‘एसआयपी’च्या माध्यमातून आपण दरमहा ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवत असतो. ‘एसआयपी टॉप-अप’मध्ये आपण दर महिन्याला निश्चित केलेल्या ‘एसआयपी’च्या रकमेत वार्षिक आधारवर वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीला देते. साहजिकच आपली दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधा अधिक फायदेशीर ठरते. उदा. जयेशने दरमहा २०,००० रुपयांची ‘एसआयपी’ पुढील २० वर्षांकरिता केली आहे. जयेशचा मित्र मंगेश यानेदेखील २०,००० रुपयांची ‘एसआयपी’ केली आणि दरवर्षी त्यात २,००० रुपयांची वाढ करण्याची सूचना म्युच्युअल फंड कंपनीस दिली. दरवर्षी उत्पन्नात वाढ झाल्यावर गुंतवणुकीतदेखील वाढ केल्यामुळे मंगेशला जयेशपेक्षा खूप जास्त फायदा झाला.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
diy barley water summer benefits hydration uti why you must include a glass of barley water to summer routine
उन्हाळ्यात रोज प्या एक ग्लास बार्लीचे पाणी; मिळतील डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

हेही वाचा – Money Mantra: नैतिकतेची चौकट

खालील तक्त्यात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

SIP Top-up


मंगेशने दरवर्षी ‘एसआयपी’ची रक्कम २,००० रुपयांनी वाढवल्यामुळे त्याची एकूण गुंतवणूक ९३.६ लाख रुपये झाली आणि २० वर्षांनी त्याला जयेशपेक्षा अंदाजे ६० टक्के जास्त रक्कम म्हणजेच ३.१७ कोटी मिळतील.

‘एसआयपी टॉप-अप’बद्दल महत्त्वाचे :

१) ‘एसआयपी टॉप-अप’ सुविधेचा मुख्य लाभ म्हणजे दरवर्षी उत्पन्न वाढल्यावर गुंतवणूकदेखील वाढवली जाते आणि मुदतपूर्तीनंतर खूप मोठी रक्कम मिळते. २) दरवर्षी ठरावीक रक्कम अथवा ठरावीक टक्क्यांनी वाढ असे दोन्ही पर्याय उपलब्ध. उदा. पहिल्या वर्षी २०,००० रुपये ‘एसआयपी’ची रक्कम आणि त्यावर दरवर्षी २,००० रुपयांनी वाढ अशा पर्यायांप्रमाणेच पहिल्या वर्षी २०,००० रुपये आणि पुढील वर्षापासून १० टक्के वाढ असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. ३) मर्यादित कालावधीसाठी ‘एसआयपी’ रकमेत वाढ व त्यानंतर समान ‘एसआयपी’ रक्कम याप्रकारेदेखील नियोजन शक्य आहे. उदा. वरील उदाहरणातील मंगेशने पहिल्या वर्षी २०,००० रुपये आणि त्यानंतर पुढील केवळ ५ वर्षे दरवर्षी २,००० रुपयांनी वाढ करण्याची सूचना दिली तर त्याची ‘एसआयपी’ची रक्कम पुढीलप्रमाणे असेल. पहिल्या वर्षी २०,००० रुपये, दुसऱ्या वर्षी २२,००० रुपये, तिसऱ्या वर्षी २४,००० रुपये याप्रमाणे वाढ होऊन सहाव्या वर्षांपासून पुढे ३०,००० रुपये. याप्रकारे नियोजन करूनदेखील मंगेशच्या गुंतवणुकीचे मूल्य २० वर्षांनंतर २.६ कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

करबचतीसाठी

‘एसआयपी’च्या मदतीने गुंतवणूक कशाप्रकारे करता येते?

  • करबचत आणि संपत्तीनिर्मिती करण्यासाठी गुंतवणूकदार करबचत योजनांमध्ये ‘एसआयपी’देखील करू शकतात. म्युच्युअल फंडाच्या करबचत योजनेत दरमहा १२,५०० रुपयांची ‘एसआयपी’ केल्यास वर्षभरात १,५०,००० रुपयांची गुंतवणूक होते. या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला प्राप्तिकर खात्याच्या कलम ८० सीनुसार करबचतीचा लाभ मिळतो.

मी ३ वर्षांपूर्वी म्युच्युअल करबचत योजनेत‘एसआयपी’ केली आणि ३ वर्ष ( मुदतपूर्ती कालावधी ) पूर्ण झाल्यावरदेखील मला गुंतवणूक काढता येणार नाही असे सांगितले. असे का?

  • म्युच्युअल फंडाच्या करबचत योजनेमध्ये ३ वर्षांचा मुदतपूर्ती कालावधी म्हणजेच लॉक-इन कालावधी असतो. याचा अर्थ ३ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय गुंतवणूक काढता येत नाही. जर गुंतवणूकदाराने एकरकमी गुंतवणूक केली असेल तर ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर रक्कम काढता येते. ‘एसआयपी’च्या माध्यमातून म्युच्युअल फंडाच्या करबचत योजनेत दरमहा गुंतवणूक करतात, साहजिकच प्रत्येक गुंतवणुकीचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावरच संपूर्ण रक्कम काढता येते. अर्थात त्याआधी रक्कम काढायची असेल तर ज्या गुंतवणुकीचे ३ वर्ष पूर्ण झालेत तितकी रक्कम काढणे शक्य आहे. उदाहरणाच्या मदतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. ‘एसआयपी’ कालावधी १ एप्रिल २०२० ते १ मार्च २०२३ असेल तर १ एप्रिल २०२० मधील गुंतवणूक १ एप्रिल २०२३ नंतर काढता येईल. तसेच १ मे २०२३ नंतर १ मे २०२० पर्यंतची गुंतवणूक काढता येईल. याप्रकारे संपूर्ण रक्कम १ मार्च २०२६ नंतरच काढता येईल.

हेही वाचा – जाहल्या काही चुका: अंतर्यामी सूर गवसला…

मी १० वर्षांसाठी ‘एसआयपी’ केली होती, त्याची मुदत ऑगस्ट २०२३ मध्ये संपणार आहे. मी ऑगस्ट २०२३ नंतर गुंतवणूक कायम ठेवावी का?

  • निश्चितच समभाग संलग्न म्युच्युअल फंडाच्या मदतीने संपत्तीनिर्मितीसाठी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कायम ठेवणे योग्य ठरते. अनेक गुंतवणूकदारांचा असा गैरसमज असतो की, ‘एसआयपी’चा कालावधी संपला की गुंतवणूक काढून घ्यावी. मात्र ‘एसआयपी’ ही एक सुविधा आहे, ज्यायोगे गुंतवणूकदार दरमहा नियमित गुंतवणूक करून दीर्घ कालावधीमध्ये संपत्तीनिर्मिती करू शकतात. साहजिकच ‘एसआयपी’चा कालावधी पूर्ण झाल्यावरदेखील आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक कायम ठेवावी. मात्र हे करत असताना आपल्या पोर्टफोलिओमधील म्युच्युअल फंड योजनांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

(लेखक पुणेस्थित अर्थविषयक व्याख्याते आणि प्रशिक्षक)