25 February 2021

News Flash

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा सराव प्रश्न

पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर ४ ऑगस्ट रोजी होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर ४ ऑगस्ट रोजी होत आहे. या पेपरच्या सरावासाठी अपेक्षित प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

*      प्रश्न १ – ‘कोणत्याही व्यक्तीस तिने केलेल्या गुन्ह्य़ासाठी त्या वेळी अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या तरतुदी अन्वये शिक्षा किंवा दंड करता येणार नाही’ या अर्थाची तरतूद पुढीलपकी कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे?

१)   भारतीय राज्यघटनेचे कलम २० व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम ११.

२)   भारतीय राज्यघटनेचे कलम २१ व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम ०९.

३)   भारतीय राज्यघटनेचे कलम २२ व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम १२.

४)   भारतीय राज्यघटनेचे कलम १९ व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम १०.

*      प्रश्न २- अनुसूचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा, १९८९ च्या कलम ३ अन्वये पुढीलपकी कोणत्या गुन्ह्य़ासाठी सहा महिने ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे?

ब.   कोणत्याही लोकसेवकाकडून अनुसूचित जाती / जमातीच्या सदस्याविरुद्ध कायदेशीर शक्तींचा वापर केला जाईल अशा तऱ्हेने खोटी माहिती पुरविणे.

क. अनुसूचित जाती / जमातीच्या सदस्याची जमीन वा जागा अन्यायाने बळकावणे.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ आणि क

*      प्रश्न ३ – नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील नागरी हक्क या संज्ञेची व्याख्या कोणती आहे?

१)   राज्यघटनेच्या कलम १९ अन्वये भारतातील सर्व नागरिकांना प्राप्त होणारा हक्क.

२)   राज्यघटनेच्या कलम  १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा हक्क.

३)   राज्यघटनेच्या कलम ३२अन्वये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा हक्क.

४)   मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम ५ अन्वये क्रूर, अमानवी वागणूक किंवा शिक्षा देण्यापासून एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा हक्क.

*      प्रश्न ४ – भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील तरतुदी अन्वये पुढील पकी कोणत्या बाबी दस्तऐवज या व्याख्येमध्ये समाविष्ट होत नाहीत?

अ. एखादा नकाशा वा आराखडा

ब.   मुद्रित शब्द

क. कोणत्याही पदार्थावर व्यक्त केलेला मजकूर

ड.   एखादे विडंबनचित्र

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ, ब आणि ड

३) ब, क आणि ड

४) वरीलपैकी नाही

*      प्रश्न ५ – हुंडा प्रतिबंध अधिनियम, १९६१ मधील तरतुदी अन्वये कोणत्याही न्यायालयास या अधिनियमाखालील अपराधांची दखल कोणत्या प्रकारे घेता येते?

अ. पोलिसी अहवालावरून.

ब.   व्यथित व्यक्तीच्या तक्रारीवरून.

क. हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून.

ड.   मान्यताप्राप्त कल्याण संस्थेच्या अहवालावरून.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ, ब आणि ड

३) ब क आणि ड

४) अ, ब, क आणि ड

*      प्रश्न ६ – महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये, पुढीलपकी कोणत्या बाबीचा समावेश फिर्याद या संज्ञेत होत नाही?

अ. पोलीस अहवाल.

ब.   कारवाईच्या अपेक्षेने केलेले तोंडी अभिकथन.

क. ज्ञात किंवा अज्ञात व्यक्तीने अपराध केल्याच्या आशयाचे लेखी अभिकथन.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ आणि क

*      प्रश्न ७ – पुढीलपकी कोणत्या पर्यायांमध्ये समाविष्ट व्यक्तींवर भारतीय दंडसंहितेच्या कलम २२३ अन्वये संयुक्तपणे दोषारोपपत्र दाखल करता येते?

अ. एकाच अपराधाबाबत अपराध केल्याचा आरोप असणारी, अपराधास अपप्रेरणा देण्याचा आरोप असणारी व तो अपराध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारी व्यक्ती.

ब.   एकास संव्यवहाराच्या ओघात निरनिराळे अपराध केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्ती.

क. एकास संव्यवहाराच्या ओघात तोच अपराध केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्ती.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ आणि क

उत्तरे

प्र.क्र.१ – योग्य पर्याय क्र.(१)

प्र.क्र.२ – योग्य पर्याय क्र.(३)

प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र.(२)

प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(४)

प्र. क्र.५- योग्य पर्याय क्र.(२)

प्र.क्र.६- योग्य पर्याय क्र.(३)

प्र.क्र.७- योग्य पर्याय क्र.(१)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:11 am

Web Title: psi main exam practice questions mpsc abn 97
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी
2 शब्दबोध : दिवटा
3 यूपीएससीची तयारी : भूगोल मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा
Just Now!
X