पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांना एमफिल व पीएच.डी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
अधिछात्रवृत्तींची संख्या : या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तींची संख्या ५० असून त्यापैकी ३ अधिछात्रवृत्ती अनुसूचित जातीतील अपंग महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक अर्हता : अर्जदार महिला अनुसूचित जातीतील व महाराष्ट्र राज्याच्या मूळ निवासी असाव्यात. त्यांनी कुठल्याही विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
अधिछात्रवृत्तीचा तपशील : या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत असेल. त्याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पहिली दोन वर्षे दरमहा २५ हजार रु. तर नंतरची तीन वर्षे दरमहा २८ हजार रु. अधिछात्रवृत्ती स्वरूपात देण्यात येतील. याशिवाय त्यांना लॅपटॉप, बार्टीतर्फे संशोधन शैक्षणिक साहाय्य, संशोधनसंबंधित साहित्य, घरभाडे भत्ता, इत्यादी लाभ नियमांनुसार देय असतील.
अधिक माहिती – योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची जाहिरात पाहावी अथवा ‘बार्टी’, पुणेच्या barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : संपूर्ण भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे- ४११००१ या पत्त्यावर ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.