वैद्यकीय सेवा क्षेत्राला समांतर अशा फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या आरोग्य सेवा क्षेत्रांमधील अभ्यासक्रमांची, शिक्षणसंस्थांची आणि करिअर संधींची सविस्तर ओळख..
गेल्या काही दशकांत, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत झपाटय़ाने होणाऱ्या प्रगतीचे पडसाद वैद्यकीय सेवा क्षेत्रावरही उमटल्याचे आपल्याला दिसून येते. याचाच परिणाम म्हणून मूलभूत वैद्यकीय सेवा क्षेत्राला समांतर अशी काही आरोग्य सेवा क्षेत्रे विकसित झाली. यांपकीच एक म्हणजे फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी.

फिजिओथेरपी
हा पेशा, आरोग्य सेवा क्षेत्राशी निगडित असून या पेशातील व्यक्ती, रुग्णाच्या शरीराच्या किंवा मनाच्या हालचालींतील बिघाड ओळखतात आणि प्रत्यक्ष रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या समन्वयाने आणि प्रगत तंत्रज्ञान व अद्ययावत उपकरणांच्या साहाय्याने उपाययोजना करतात. कधी साध्या-सोप्या व्यायाम प्रकारांचा वापर करून पीडित व्यक्तीला शारीरिकदृष्टय़ा
सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
फिजिओथेरपी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, यासाठी आवश्यक ठरणाऱ्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासोबतच शरीरशास्त्र, जैव-रसायनशास्त्र, औषध-रसायनशास्त्र, योगाभ्यास आणि व्यायाम, मानसशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र यांचेही ज्ञान आणि जाण असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे तर्कशुद्ध विचार, संयम, उत्तम संवादकौशल्य, संवेदनशीलता आणि मेहनत करण्याची
तयारी लागते.
फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी मुख्यत्वे करून सांधेदुखी, पाठीच्या व मानेच्या मणक्यांचे आजार, दीर्घकालीन आजाराने उद्भवणाऱ्या हातापायांच्या हालचालीतील अडचणी, मोठय़ा शस्त्रक्रियेपश्चात स्नायूंची किंवा सांध्यांची काळजी, शरीरातील अंतर्गत अवयवांची (हृदय, फुप्फुस वगरे) कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम, अर्धागवायूमुळे येणारी हालचालीतील शिथिलता, खेळाडूंना होणारे अपघात आणि दुखापती अशा विविध कारणांसाठी परिणामकारक ठरू शकते.

शिक्षणक्रम
६ बी.एस्सी. फिजिओथेरपी (बीपीटी)
अर्हता- १०+२ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण जीवशास्त्र विषयासह. बारावी परीक्षेतील एकूण टक्केवारी व प्रवेश परीक्षेतील कामगिरी लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो.
वरील शिक्षणक्रमांचा कालावधी ४ वष्रे आहे. त्यानंतर प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांची इंटर्नशिप करावी लागते.
६ पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन
फिजिओथेरपी (एमपीटी)
कालावधी- २ वष्रे. अर्हता- उमेदवार फिजिओथेरपीतील पदवीधर असणे अनिवार्य. आवश्यक गुण- किमान ५० टक्के. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
६ डिप्लोमा कोस्रेस इन फिजिओथेरपी.
अर्हता- १०+२ उत्तीर्ण. हा शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना ऑस्टोपॅथ, प्रशिक्षक, रिसर्च असिस्टंट, असिस्टंट फिजिओथेरपिस्ट अशा प्रकारच्या नोकरीच्या संधी सरकारी आणि खासगी रुग्णालये, अपंग पुनर्वसन केंद्रे, लष्करी आरोग्य सेवा केंद्रे येथे
मिळू शकतात.

ऑक्युपेशनल थेरपी
करिअरचे हे क्षेत्र वैद्यकीय सेवा क्षेत्राशी निगडित असून, शरीराने किंवा मनाने अपंग व्यक्तीला, सामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम बनवण्याचे काम या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्ती वैद्यकीय उपचारांच्या जोडीने करतात.
६ बी.एस्सी. ऑक्युपेशनल थेरपी (बीओटी)
अर्हता- १०+२ सायन्स शाखेतून उत्तीर्ण असावे. जीवशास्त्र विषयासह हा शिक्षणक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी ऑपरेशन नर्स किंवा टेक्निशियन, सीनिअर स्टाफ नर्स, क्रिटिकल केअर नर्स, इन्फेक्शन कंट्रोल नर्स, सर्जरी टेक्निशियन, प्रशिक्षक बनू शकतात.
वरील शिक्षणक्रमांचा कालावधी ४ वष्रे असून प्रशिक्षण आणि सहा महिन्यांचा आंतरवासिता कार्यकाल पूर्ण करावा लागतो.
६ एम.एस्सी. ऑक्युपेशनल थेरपी (एमओटी)
अर्हता- बी.एस्सी. ऑक्युपेशनल थेरपी हा पूर्णवेळ अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुणांनिशी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेला असावा. कालावधी- २ वष्रे.
हा शिक्षणक्रम पूर्ण केलेले उमेदवार रुग्णालये, शाळा, शुश्रूषागृहे, आरोग्य सेवा केंद्रे अशा ठिकाणी ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मेडिकल लॅब टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर इनचार्ज, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळवू शकतात.

डिप्लोमा ऑक्युपेशनल थेरपी
अर्हता- १०+२ विज्ञान शाखा उत्तीर्ण. हे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार खासगी, सरकारी रुग्णालये, रुग्णालयांच्या व्यवस्थापन सेवेत किंवा प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करू शकतात. या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधीही मिळू शकतात.
वरील सर्व शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विज्ञान बारावी परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे आणि सामायिक वैद्यकीय प्रवेशपरीक्षा देणे अनिवार्य ठरते.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ऑर्थोपेडिक, न्यूरोसायन्सेस, मस्क्युलोस्केलेटल, पेडियाट्रिक्स, कार्डिओरेस्पिरेटरी, मानसिक आरोग्य अशा विविध वैद्यकीय अभ्यासशाखांतून पदवी प्राप्त करता येते.

स्पोर्ट्स फिजिओथेरपी
विविध प्रकारच्या क्रीडाप्रकारांमध्ये कामगिरी बजावताना किंवा सराव करताना खेळाडूंना होणाऱ्या दुखापती, सांध्यांची झीज, हाडांचे अपघात यांत फिजिओथेरपी कार्यक्षेत्र अधिक प्रभावी ठरते.
गुरू नानकदेव विद्यापीठ संचालित स्पोर्ट्स मेडिसिन आणि फिजिओथेरपी विभागात स्पोर्ट्स फिजिओथेरपीमधील पदवी – पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
६ मास्टर्स इन स्पोर्ट्स फिजिओथेरपी –
कालावधी २ वष्रे. अर्हता- उमेदवार बीपीटी (फिजिओथेरपी पदवीधर) असावा. त्याने किमान ५० टक्के गुणांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीप्राप्त केलेली असावी. २स्र्१३२स्र्ँ८२्र३ँी१ंस्र्८्रल्ल्िरं.ूे

करिअर संधी
सध्या स्पोर्ट्स फिजिओथेरपी या करिअर क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते. खासगी, सरकारी रुग्णालये, अपंग पुनर्वसन केंद्रे, रुग्णालयातील शस्त्रक्रियापश्चात रुग्ण पुनर्वसन, हेल्थ क्लब, दुखापतग्रस्त खेळाडू, वयोवृद्ध पुनर्वसन केंद्रे अशा अनेक आघाडय़ांवर या शाखेतील प्रशिक्षित व्यक्तींना मोठी मागणी असते. स्नायू दुखापत किंवा मेंदूसंबंधी आजाराने त्रस्त, विकलांग व्यक्तींना आयुष्य पूर्ववतपणे जगता यावे याकरता, प्रत्यक्ष रोगावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या औषधोपचारांच्या जोडीने फिजिओथेरपीचे उपचार परिणामकारक ठरतात. सध्या ठिकठिकाणी उघडणारी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, क्लिनिक्स यांची संख्या पाहता फिजिओथेरपी करिअर क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी निर्माण होत आहेत.
* या विषयातील पदवीधर व्यक्तींना शारीरिकदृष्टय़ा विकलांग व्यक्तींसाठीची पुनर्वसन केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, देशाच्या सुरक्षा यंत्रणेअंतर्गत उभारलेली आरोग्य केंद्रे, रुग्णालये, पुनर्वसन केंद्रे, हेल्थ क्लब, जिम्नॅशियम, खासगी-सरकारी रुग्णालये, मनोरुग्ण पुनर्वसन केंद्रे, ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रे, विकलांग मुलांसाठीच्या शाळा येथे कामाची संधी मिळू शकते.
* शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना, फिजिओथेरपी क्षेत्रात उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतात आणि नंतर महाविद्यालयात, खासगी शिक्षण संस्थांमध्ये या विषयातील प्राध्यापक किंवा प्रशिक्षक म्हणून काम
करता येते.
* पदवीधर व्यक्तींना तद्नुषंगिक स्पोर्ट्स, पेडिअ‍ॅट्रिक्स, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक अशा विषयात उच्च शिक्षण घेता येते.

या करिअर क्षेत्राला परदेशातही उत्तम
वाव असल्याचे चित्र दिसून येते. आरोग्यासंबंधी असलेली जागरूकता, आíथक सधनता आणि नियोजनबद्ध उपचार पद्धती या गोष्टींचा अवलंब कॅनडा, अमेरिका, इंग्लंड तसेच युरोपातील अन्य देशांत होताना दिसतो. तेथील सुसज्ज
अपंग पुनर्वसन केंद्रे, मनोरुग्णालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शाळा येथे प्रशिक्षक म्हणूनही या करिअर क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत.

गीता सोनी
sportsphysiotherapyindia.com