भारतीय वायुदलात ठाणे येथे स्टोअरकीपरच्या २ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांना स्टोअरकीपिंगविषयक कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज कमांड अ‍ॅडमिन ऑफिसर, एअरफोर्स स्टेशन, कोलशेत रोड, पोस्ट सँडोझ बाग, ठाणे- ७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७.

भारतीय वायुदलात मुंबई येथे सुपरिटेंडेंट (स्टोर्स)च्या २ जागा-

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना स्टोर्सविषयक कामाचा अनुभव असायला हवा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील व संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांड अ‍ॅडमिन ऑफिसर, एअरफोर्स स्टेशन, कलिना मिलिटरी कॅम्प, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००२९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७.

संरक्षण दलात कुलाबा मुंबई येथे पेंटर म्हणून संधी-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण दल कुलाबा, मुंबईची जाहिरात पाहावी. तपशीलवार अर्ज कमांडिंग ऑफिसर ऑफ एमजी अ‍ॅण्ड जी एरिया- प्रोव्होस्ट युनिट, कुलाबा डिफेन्स स्टेशन, कुलाबा- मुंबई ४००००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७

केंद्र सरकारच्या व्यापार मंत्रालयांतर्गत विशेष आर्थिक क्षेत्र, इंदोर येथे स्टेनोग्राफरच्या ४ जागा-

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली विशेष आर्थिक क्षेत्र, इंदोरची जाहिरात पाहावी अथवा http://www.indoresez.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि डेव्हलपमेंट कमिशनर इंदोर, स्पेशल इकॉनॉमिक झोन, तिसरा मजला, ब्रिलियंट टायटेनियम, प्लॉट नं. ९, स्कीम नं. ७८, पार्ट- २ ब्रिलियंट कन्व्हेंशन सेंटर जवळ, इंदोर (मप्र) ४५२०१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१७.

इस्रोच्या बंगलोर येथील मुख्यालयात वैज्ञानिक/ अभियंता पदाच्या २२ जागा-

उमदेवारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग इंजिनीअरिंग वा आर्किटेक्चरमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी इस्रोच्या  www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१७.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग- नीटी, मुंबई येथे अग्निशमन अधिकारी म्हणून करारतत्त्वावर संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नीटी मुंबईची जाहिरात पाहावी अथवा नीटीच्या www.nitie.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार भरलेले अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, नीटी, विहार लेक रोड, पवई, मुंबई- ४०००८७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१७.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, बंगलोर येथे सायंटिस्ट/ इंजिनीअरच्या १० जागा-

अर्जदार इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, एरोनॉटिकल, एरोस्पेस, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असायला हवा. पीएचडी पात्रताधारकांना प्राधान्य. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकातील एरोनॉटिकल अ‍ॅथॉरिटी, बंगलोरची जाहिरात पाहावी अथवा अ‍ॅथॉरिटीच्या www.ada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७.