रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया सíव्हसेस बोर्ड, मुंबई आरबीआयसाठी ‘ऑफिसर्स ग्रेड-बी (डीआर)’ जनरल -१४५ पदे
(इमाव – ३९, अजा – २२, अज – ११), डीईपीआर – १२ पदे (जन. – ९, इमाव -३), डीएसआयएम -४ पदे (जन. – १, अजा -१,
अज – २).
पात्रता –
१) ऑफिसर्स (जनरल) – पदवी उत्तीर्ण (१०वी, १२वी आणि पदवीला सरासरी किमान ६०% गुण आवश्यक) (अजा/अज/विकलांगांसाठी – ५०% ).
२) ऑफिसर्स (डीइपीआर) – इकॉनॉमिक्स/फायनान्समधील पदव्युत्तर पदवी सरासरी किमान ५५% गुणांसह (अजा/अज/विकलांग किमान ५०% ).
३) ऑफिसर्स (डीएसआयएम) – मॅथेमॅटिक्समधील पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह १ वर्षांचा डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स.
वयोमर्यादा – (दि.१ मे २०१७ रोजी) ३० वष्रेपर्यंत (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५वष्रे).
अजा /अज/इमाव/विकलांग उमेदवारांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण (ऑफिसर्स जनरलसाठी) आयआरबीमार्फत दिले जाईल.
ऑनलाईन अर्ज http://www.rbi.org.in/ या संकेतस्थळावर दि. २३ मे २०१७ (२४.००) पर्यंत करावेत.
भारतीय नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकूण ३८४ ‘ट्रेड्समन मेट’ या पदाची भरती. (यूआर- १९४, अजा – ५७, अज – २९, इमाव – १०४)
(माजी सनिकांसाठी ६८ जागा आणि विकलांग (एलव्ही, एचएच, ओएच प्रत्येकी ४) १२ जागा राखीव).
पात्रता – १०वी उत्तीर्ण.
निवड पद्धती – गुणवत्तेनुसार १: ५० याप्रमाणे लेखी परीक्षेस बोलाविले जाईल.
सामान्य बुद्धिमत्ता, गणितीय क्षमता, इंग्रजी, सामान्य ज्ञान प्रत्येकी २५ गुण अशी एकूण १०० गुणांसाठी लेखी परीक्षा.
ऑनलाइन अर्ज २० मे २०१७ पर्यंत www.bhartiseva.com या संकेतस्थळावर करावेत.
विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ एप्रिल २०१७ च्या अंकात पहावी. (पान क्र. १२/१३)
भारतीय नौसेनेत अविवाहित पुरुष उमेदवारांची ‘सेलर्स एमआर (म्युझिशियन)’ पदांची भरती.
पात्रता – १० वी उत्तीर्ण.
वय – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००० दरम्यानचा असावा. असाधारण कौशल्य असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट.
संगीत क्षमता – कर्ण पात्रता आणि संगीतातील सिद्धांत जसे की नोटेशन इ. मध्ये पारंगत. भारतीय अथवा परदेशी कोणतेही एक वाद्य वाजविण्यात पारंगत असावा.
वेतन – सुरुवातीला १५ महिन्यांचे बेसिक ट्रेिनग दरम्यान रु. ५,७००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेिनग पूर्ण केल्यानंतर पूर्ण पगार आणि स्टायपेंड यातील फरक दिला जाईल. पे बँड रु. ५,२००/- – २०,२००/- ग्रेड पे रु. २,०००/- एमएसपी रु. २,०००/- डीए. विहित नमुन्यातील अर्ज साध्या पोस्टाने `The Commanding Officer, (for Director of Music) INS Kunjali, Colaba, Mumbai – 400 005′ या पत्त्यावर दि. १९ मे २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाचा विहित नमुना www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल.