केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत मुंबई येथे सीनिअर डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स) म्हणून संधी-
अधिक माहिती व तपशीलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ मे २०१७ च्या अंकातील कंपनी व्यवहार मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा मंत्रालयाच्या http://www.sfio.nic.in/ अथवा http://www.mca.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिस, दुसरा मजला, पं. दियदयाळ उपाध्याय मार्ग, अंत्योदय भवन, बी-३ विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११० ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१७.
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे कन्सलटंट- इंटलेक्युअल प्रॉपर्टी म्हणून संधी-
अर्जदार बायोटेक्नॉलॉजी वा फार्मसी सायन्स मधील एमएससी/ पीएचडी पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणि आलेख चांगला असावा व त्यांना याच क्षेत्रातील संशोधन शैक्षणिक कामाचा अनुभव असायला हवा.
अधिक माहिती व तपशीलासाठी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २५७०८००० वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या http://www.nccs.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्ण भरलेले तपशीलवार अर्ज दि डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे विद्यापीठ परिसर, गणेश खिंड, पुणे- ४११ ००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१७.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा साहाय्यक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) पदाची संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी दूरध्वनी क्र. ०२२-२२७९५९०० अथवा २२६७०२१० किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरील https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/47-2017.pdf या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१७.
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे येथे संशोधक म्हणून संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणेची जाहीरात पहावी अथवा केंद्राच्या http://www.nccs.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तपशीलवार भरलेले अर्ज संचालक, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेश खिंड, पुणे- ४११००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०१७.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैद्राबाद येथे रिसोर्स मॅनेजमेंट सुपरवायझर्सच्या ४ जागा-
उमेदवार पदवीधर असावेत व त्यांनी व्यवस्थापन, एचआर, कर व्यवस्थापन यांसारख्या विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी. एमबीए उत्तीर्णाना प्राधान्य.
अधिक माहिती व तपशिलासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैद्राबादच्या दूरध्वनी क्र. ४०- २३२५३६११ वर संपर्क साधावा अथवा सिक्युरिटी प्रेसच्या http://www.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०१७.