• नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास – गरजा व महत्त्व, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता, गृहनिर्माण, परिवहन (रस्ते, बंदरे इ.) संसूचना (टपाल व तारायंत्र, दूरसंचार), रेडिओचे नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल अशा सामाजिक व आíथक पायाभूत सुविधांची वाढ व विकास, परिवहन व गृहनिर्माण (नागरी व ग्रामीण) समस्या – केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे उपक्रम व कार्यक्रम, भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित पेचप्रसंग व समस्या, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारची व राज्य शासनाची धोरणे, भारतीय वित्त विकास व पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांच्या विकासाचे खाजगीकरण, पर्यायी धोरण, सरकारी – खाजगी क्षेत्रातील भागीदारी (पीपीपी), बीओएलटी (बांधा, वापरा, भाडेपट्टय़ाने द्या, हस्तांतरित करा) व बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) योजना.
  • भारतीय कृषी व्यवस्था, ग्रामविकास व सहकार – आíथक विकास व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राची भूमिका – कृषी, उद्योग व सेवाक्षेत्रे यांच्यामधील आंतरसंबंध. योजना कालावधीमधील ग्रामीण विकासाची धोरणे- ग्रामीण पायाभूत सोयी (सामा. व आíथक) जागतिक व्यापार संघटना व शेती – शेतकऱ्यांचे व पदासकारांचे हक्क कृषी बाजारपेठेतील गॉटचा अपेक्षित भार. कृषीविषयक धंदा व जागतिक बाजारपेठ
  • ग्रामीण कर्जबाजारीपणा – शेतीला अर्थसाहाय्य – भारतातील कृषीविषयक पतवारी- समस्या, गरज, महत्त्व, गुंतलेल्या वित्तीय संस्था, नाबार्ड, भूविकास बँक. कृषी किंमत-घटक, कृषी उत्पादनांवर परिणाम करणारे घटक- शासकीय आधारभूत किमती, अर्थसाहाय्य, कृषी पणन-सद्य:स्थिती, मूल्यवíधत उत्पादने, शासनाची भूमिका आणि कृषी पणनातील त्यांच्या संस्था.
  • सहकार – सहकाराची संकल्पना, अर्थ, उद्दिष्टे, जुनी व नवीन तत्त्वे, भारतातील सहकार चळवळीची वाढ व वैविध्यीकरण, महाराष्ट्रातील सहकारी संस्था – प्रकार, भूमिका, महत्त्व व वैविध्यीकरण, राज्यधोरण व सहकार क्षेत्र, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व साहाय्य, कायदे, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या समस्या – जागतिक स्पध्रेच्या युगात सहकारी संस्थांचे भवितव्य, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आढावा, सुधारणा व भवितव्य-कृषी पणन यांतील पर्यायी धारेणविषयक पावले-रोजगार हमी योजना.
  • शेतीसाहित्य व उत्पादन – विपणन व मूल्यांकन, किमतीतील चढउतार, कृषी अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांची भूमिका. जमीनधारणा आकार आणि उत्पादकता – जमीन सुधारणा व जमिनीचा वापर. कृषीविषयक उत्पादन आणि कमी उत्पादकतेची कारणे कंत्राटी शेती – ठरावीक शेती – औद्योगिक शेती – सेंद्रिय शेती. कृषी उत्पन्न वाढीतील प्रादेशिक तफावत – कृषीविषयक किमती आणि व्यापाराच्या अटी.
  • पाटबंधाऱ्याची साधने व जलव्यवस्थापन- मृदा व जल संधारण, पर्जन्याश्रयी शेती यांसारख्या विकासकामांकरिता सिंचन आणि त्याच्या पद्धती.
  • हरित क्रांती व तंत्रशास्त्रविषयक बदल- आयसीएआर, एमसीएईआर यांची भूमिका, शेतीचे यांत्रिकीकरण, जैवविविधता, जीएम तंत्रज्ञान.
  • पशुधन संपत्ती- उत्पादकता, भारतातील आणि महाराष्ट्रातील धवलक्रांती, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन व पुष्पसंवर्धन विकास.
  • अन्न व पोषण आहार – भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल, पहिली व दुसरी हरित क्रांती, अन्न स्वावलंबन, अन्नसुरक्षा. अन्न सुरक्षिततेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, अन्नाचे कॉलरी मूल्य व त्याची मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहार मानवी शरीरास आवश्यक ऊर्जा व पोषण मूल्य. भारतातील पोषणविषयक समस्या, त्याची कारणे व परिणाम, शासनाची धोरणे व सार्वजनिक वितरण व्यवस्था कार्यक्रम, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना व इतर पोषणविषयक कार्यक्रम, अन्न सुरक्षा अधिनियम.
  • íथक विकासाचे घटक – नसíगक साधनसंपत्ती, पायाभूत सुविधा, लोकसंख्या, मानवी भांडवल- लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत- मानवी विकास निर्देशांक -मानवी दारिद्रय़ निर्देशांक- िलग सक्षमीकरण उपाययोजना.
  • विकास निदर्शक – सातत्यपूर्ण विकास, विकास व पर्यावरण, हरित स्थूल देशांतर्गत उत्पन्न.
  • वाढीमधील विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची भूमिका – बहुराष्ट्रीय महामंडळे. वाढीचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार-आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. आयएमएफ-आयबीआरडी-डब्ल्यूटीओ-प्रादेशिक व्यापार करारनामा-सार्क-एएसईएएन.