* ‘ओएनजीसी’अंतर्गत ओएनजीसी एनर्जी सेंटरतर्फे राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जाविषयक विशेष व सृजनशील संशोधनसाठी देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे संशोधक-विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
* आवश्यक पात्रता- अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी, पदव्युत्तर पदवी वा पीएचडी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व ते हरित वा अपरंपरागत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात नावीन्यपूर्ण व संशोधक प्रकल्पांवर सक्रियपणे कार्यरत असावेत व त्यांना याच क्षेत्रातील संशोधनपर कामाची आवड असायला हवी.
* वयोगट : अर्जदारांचे वय १ जानेवारी २०१७ रोजी ३२ वर्षांहून अधिक नसावे.
* पुरस्कार रक्कम व प्रमाणपत्र- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रवेशिकांतून पहिल्या दोन संशोधन-पुरस्कारांची अंतिम निवड करण्यात येईल. यापैकी प्रथम पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांला १० लाख रु. तर द्वितीय पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांला ५ लाख रु. देण्यात येतील.
याशिवाय सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सहभागी होण्याबद्दल प्रमाणपत्र, तर निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन प्रकल्पाचे प्रायोगिक प्रारूप तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- या विशेष संशोधन पुरस्कार योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ओएनजीसी एनर्जी सेंटर, नवी दिल्लीच्या दूरध्वनी क्र. ०११- २२४०६०३६ वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या
http://www.ongcindia.com/wps/wcm/reportspdf/common/Announcement280317.pdf या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* प्रवेशिका पाठविण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर तपशीलवार प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१७.
– द. वा. आंबुलकर