मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो. त्यामुळे या परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप आंतरशाखीय आणि बहुआयामी असते. कोणत्याही विषयाच्या मूलभूत आयामांमध्ये त्याचे भौगोलिक आयाम महत्त्वाचे असतात. भूगोल हा विषय महत्त्वाच्या चालू घडामोडींसह अनेक विषयांच्या अभ्यासाचा संकल्पनात्मक पाया मजबूत करण्याचे काम
करतो. या विषयाचे प्रश्न उपयोजित प्रकारचे, व्यावहारिक ज्ञान तपासणारे असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भूगोलाची तयारी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
अभ्यासाच्या सोयीसाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाची वेगळ्या प्रकारे मांडणी करणे व्यवहार्य ठरेल. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोल व हवामान या घटकांचा एकत्रित अभ्यास केल्याने भौगोलिक संज्ञा व्यवस्थित कळू शकतात. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह यातील सर्व मुद्दे अभ्यासावेत.
प्राकृतिक भूगोल व हवामान
पृथ्वीची अंतरंग रचना व प्राकृतिक जडणघडण, भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक, भूरूपिक चक्रांची संकल्पना, नदीसंबंधी, शुष्क, हिम, समुद्रतटीय चक्र यांच्याशी संबंधित भूरूप, भारतीय उपखंडाची उत्क्रांती व भूरूपवर्णन, महत्त्वाचे भूरूपकीय प्रदेश- पूर समस्या- महाराष्ट्राचा भूरूपीय तपशील, महाराष्ट्राची भूरूपिक वैशिष्टे, भारताचे त्यांच्या शेजारील देशांच्या, िहद महासागराच्या, आशियाच्या व जगाच्या संदर्भातील मोक्याचे ठिकाण असा अभ्यास आवश्यक आहे.
वातावरण- रचना व संरचना, उष्मा समतोल, हवामानाचे घटक तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्थानिक वारे, मान्सून, वायुराशी आणि पुरोभाग व चक्रीवादळे, भारतीय मान्सूनचे तंत्र, पावसाचे पूर्वानुमान, पर्जन्यवृष्टी, चक्रीवादळे, अवर्षण व पूर व हवामान प्रदेश, महाराष्ट्रातील पर्जन्यवृष्टीचे वितरण- अभिक्षेत्रीय व कालिक परिवर्तनशीलता.
जल व्यवस्थापन- सद्य परिस्थिती, जल संधारणाच्या पद्धती व त्याचे महत्त्व, पाण्याच्या गुणवत्तेची मानके, देशातील नद्यांची आंतरजोडणी, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या पारंपरिक व अपारंपरिक पद्धती, भूजल व्यवस्थापन- तांत्रिक व सामाजिक बाबी, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या पद्धती, पाणलोट क्षेत्राची संकल्पना व पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन.
कृषी पारिस्थितिकी- कृषी विभागातील सर्व संबंधित मुद्दे एकत्रित अभ्यासायला हवे. या मुद्दय़ांमध्ये कृषी परिस्थितिकी व त्याचा मानवाशी, नसíगक साधनसंपत्तीशी संबंध, त्याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन व संवर्धन, पीक वितरण व उत्पादनाचे घटक म्हणून प्राकृतिक व सामाजिक पर्यावरण, पीकवाढीचे घटक म्हणून हवामान घटक, पर्यावरणीय प्रदूषण व पिके, प्राणी व मानव यांच्या संबंधातील धोके, महाराष्ट्राच्या विविध कृषी हवामान क्षेत्रातील पीक प्रारूप, पीक लागवडीच्या पद्धतींतील बदलांवर उच्च उत्पन्नाच्या व कमी वेळेतल्या विविध प्रकारच्या पिकांचा प्रभाव, बहुविध पीक लागवडीची संकल्पना व आंतरपीक लागवड व त्याचे महत्त्व, सेंद्रिय शेतीची आधुनिक संकल्पना, वर्धनक्षम कृषी कोरडवाहू जमिनीवरील शेती व त्यातील समस्या, पीक उत्पादनासंबंधात पाणी वापराची क्षमता, जल सिंचनाचे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजना, ठिबक व तुषार जलसिंचन, पाणथळ मृदेचे जल:निस्सारण, कारखान्यातील दूषित पाण्याचा जमीन व पाणी यांवर होणारा परिणाम असे विविध घटक अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.
महाराष्ट्रातील कृषी हवामान क्षेत्रे- अवर्षण व टंचाईची समस्या, अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, कृषी, उद्योग व घरगुती क्षेत्रातील पाण्याची आवश्यकता, पिण्याच्या पाण्याची समस्या.
सामाजिक भूगोल- सामाजिक भूगोलामध्ये वसाहती व स्थलांतर तसेच लोकसंख्येची रचना व वैशिष्टय़े अभ्यासावीत. त्यामुळे महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल तसेच जन, भूगोलशास्त्र (महाराष्ट्राच्या संदर्भात) हे घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल- जनतेचे स्थलांतर, त्यामागील कारणे व परिणाम, ऊसतोडणी कामगार साधनसंपत्ती व ज्या प्रदेशात स्थलांतर होते त्या प्रदेशावरील स्थलांतराचा परिणाम. महाराष्ट्रातील ग्रामीण वस्त्या, शहरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या- पर्यावरण, गृहनिर्माण, झोपडपट्टी, पाणीपुरवठा व स्वच्छता, शहरी वाहतूक व प्रदूषण.
जन, भूगोलशास्त्र (महाराष्ट्रासंदर्भात)- स्थलांतराची कारणे व परिणाम, ग्रामीण व शहरी वसाहती- ठिकाण, परिस्थिती, प्रकार, आकारमान, मोकळ्या जागा व भूरूपिकीय स्वरूप, शहरीकरण प्रक्रिया व समस्या, ग्रामीण- शहरी किनार, शहरी प्रभावाचे क्षेत्र, प्रादेशिक असमतोल.
आर्थिक भूगोल- आर्थिक भूगोल अभ्यासताना कृषिक्षेत्राच्या आर्थिक आयामांचा समावेश करावा.
महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल- खनिजे व ऊर्जा साधनसंपत्ती, राज्यातील खनिज संपत्तीचे वितरण, महत्त्व व विकास, राज्यातील पर्यटन धार्मिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, पर्यावरणभिमुख (इको) पर्यटन व सांस्कृतिक वारसा, राज्यातील संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व किल्ले, व्याघ्र प्रकल्प.
पर्यावरणीय भूगोल- परिस्थिती विज्ञान व परिस्थितीकी, ऊर्जा प्रवाह, वस्तू चक्र, अन्नशृंखला व जाळे, पर्यावरणीय अवनती व संवर्धन, जागतिक पारिस्थितिकीय असमतोल- प्रदूषण व हरितगृह परिणाम, हरितगृह परिणामातील कार्बन डायऑक्साइडची व मिथेनची भूमिका, जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास, पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण, क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स, शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र- एक व सागरी संरक्षित क्षेत्र- दोन.
सुदूर संवेदन– सुदूर संवेदनांची संकल्पना, भारतीय सुदूर संवेदना उपग्रह कल्पनाचित्र, भारतीय सुदूर संवेदना उपग्रह निर्मिती, एमएसएस बॉन्ड- निळा, हिरवा, लाल व लालसर रंगाच्या जवळचा, आभासी रंग मिश्रक (फास्ट कल कॉम्पझिट (एफसीसी). नसíगक साधन संपत्तीसह सुदूर संवेदनेचा वापर करणे. भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) व जागतिक स्थाननिश्चिती यंत्रणा (जीपीएस) सुरू करणे.
मृदा- मृदा प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा तयार होण्याची प्रक्रिया व घटक, खनिजे आणि मातीचे सेंद्रिय घटक आणि मातीची उत्पादकता कायम ठेवण्यामधील त्यांची भूमिका, मातीतील आवश्यक असे वृक्ष लागवडीसाठीचे पोषक घटक आणि इतर लाभदायक घटक आणि समस्याग्रस्त जमिनी व त्या लागवडी योग्य करण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील मृदा अपक्षरण व जमीन ओसाड होण्याच्या समस्या, जल विभाजकाच्या आधारे मृत संधारणाचे नियोजन करणे, डोंगराळ, डोंगराच्या पायथ्यावरील व दरीतील जमिनीची धूप व पृष्ठवाह व्यवस्थापन, त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धती व घटक.
प्रत्यक्ष अभ्यासाच्या पद्धतीबाबत पुढील लेखात सविस्तर चर्चा करू.
रोहिणी शहा

Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
how VVPAT works
विरोधी पक्षांना EVM पेक्षा VVPAT मशीन का आवडते? राजकीय पक्षांना सर्व स्लिप्सची पडताळणी का हवी आहे?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?