मच्छीमार युवकांना प्रशिक्षण
नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छीमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छीमार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदुर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
- प्रशिक्षण कालावधी-६ महिने.
- प्रशिक्षणार्थी क्षमता-२२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षणार्थी शुल्क-दारिद्रय़ रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा १०० रुपये
- दारिद्रय़ रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा ४५० रुपये
पात्रता
- प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार असावा.
- प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षांचा अनुभव असावा.
- प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
- प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थी किमान चौथी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थीस मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
मच्छीमारांना डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती
निकष
- निर्धारित केलेल्या निकषाप्रमाणे डिझेल कोटा राहील.
- प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करून दिलेल्या सिलेंडर निहाय नौकांच्या डिझेल कोटा मंजुरीच्या निकषांच्या मर्यादेतच प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहील.
- निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी डिझेल खरेदी केले असेल तर त्या महिन्याचा उर्वरित कोटा व्यपगत होईल.
- सदर योजना महाराष्ट्रात नोंदविलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांकरिता अनुज्ञेय राहील.
- डिझेल कोटा उचलीकरिता विहित नमुन्यात डिझेल वितरण पुस्तिका ठेवावी लागेल.
- लाभधारक सदस्यांना स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक राहील.