ज्येष्ठ नागरिकांना अगदी सहजपणे आपल्या संगणकाच्या मदतीने म्हणजेच ऑनलाइन नोंदणी पद्धतीने ‘ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र’ मिळावे

यासाठी सरकारी यंत्रणांतर्फे उपाययोजना करण्यात आलेली आहे. मुंबई विभागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ‘ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र’ कसे काढावे याची माहिती खालीलप्रमाणे-

  • प्रथम http://mumbaicitysetu.org/Marathi/index.html .या संकेतस्थळावर जावे.
  • त्यावर ऑनलाइन अर्ज हा पर्याय निवडावा.
  • ज्येष्ठ नागरिक दाखला अर्ज यावर क्लिक करावे.
  • आता आपल्यासमोर सुरू झालेल्या पानावर काही रकाने दिसतील. त्यात आपली वैयक्तिक माहिती भरा.
  • यात आपल्याला आपली जन्मतारीख, संपूर्ण पत्ता, नाव, मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती द्यावी लागेल. माहिती भरून झाल्यावर ‘सबमिट’चे बटण दाबा. समजा, यातील एखादी माहिती चुकली असेल तर ‘रिसेट’चे बटण दाबून पुन्हा माहिती भरा.
  • आता भरलेल्या माहितीची खातरजमा करून ती योग्य असल्यास ‘सबमिट’च्या बटणावर क्लिक करा. आपल्यासमोर आता ‘ओके’ असे लिहिलेली एक विंडो येईल,त्यावर क्लिक करा.
  • आलेल्या माहितीची छापील प्रत घेऊन तिथे नमूद केलेल्या कागदपत्रांसहित हा ऑनलाइन फॉर्म सरकारी कार्यालयात जमा करा. हा फॉर्म भरून झाल्यावर आपल्याला यूआयडी क्रमांक दिला जाईल, तो जपून ठेवा.

या क्रमांकावरून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन पद्धतीने यासाठी सोयीस्कररीत्या रांगेत उभे न राहता, कार्यालयाच्या फेऱ्या मारणे टाळून तुम्ही तुमचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळवू शकता.