मुलाखतीत डोकावणारा तुमचा छंद

छंद ही प्रत्येकाची व्यक्तिगत नसíगक आवड, अभिरुचीची बाब असते. व्यक्तीची अभिरुची आणि आवडीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू,

छंद ही प्रत्येकाची व्यक्तिगत नसíगक आवड, अभिरुचीची बाब असते. व्यक्तीची अभिरुची आणि आवडीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू, विचारधारणा, उमेदवाराचा मानसिक स्तर, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तपासण्यात येतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पारख करण्यासंदर्भात छंद हा सर्वाधिक महत्त्वपूर्ण पलू सिद्ध होऊ शकतो. छंदाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज- नसíगक, माहितीपूर्ण आणि तर्कशुद्ध असतील तर मुलाखत प्रभावशाली ठरते.
मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये उमेदवाराच्या छंदाविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणून प्रोफाइलमध्ये छंदाची नोंद करताना अतिशय काळजीपूर्वक, पूर्ण विचारांती, यशस्वी उमेदवारांशी आणि मार्गदर्शकांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घ्यावा. सहकारी उमेदवार मित्राने लिहिलेला छंद कॉपी-पेस्ट करण्याची अनेक उमेदवारांची कॉमन सवय मुलाखतीसाठी अतिशय नुकसानकारक, घातक सिद्ध होऊ शकते. फक्त मुलाखतीसाठीच एखाद्या ‘रेडिमेड छंदा’विषयी प्रश्नोत्तरांची घोकंपट्टी केली असेल तर ती उपयोगी ठरणार नाही.
प्रत्येकाचा छंद व्यक्तिसापेक्ष आवडी-निवडीनुसार भिन्न असू शकतो. उमेदवारांनी आपली विशेष आवड, अभिरुची किंवा छंद नेमका कोणता आहे, हे गांभीर्याने विचार करून निश्चित केले पाहिजे. आपल्या विशेष छंदाविषयी तुम्हाला स्पष्ट जाणीव असली पाहिजे. तुम्ही एक-दोन पर्यटनस्थळांना भेटी दिल्या म्हणजे पर्यटन हा तुमचा छंद आहे हे सिद्ध होत नाही. मुलाखत मंडळावर अशा गोष्टींचा सकारात्मक प्रभाव पडत नाही. तुमचा छंद तुम्ही मनापासून जोपासत असला पाहिजे. छंदाविषयी विस्तृत आणि सूक्ष्म माहिती असली पाहिजे. त्याविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता उमेदवारात असली पाहिजे.
तुमचा व्यवसाय, काम-धंदा छंद होऊ शकत नाही. ती उपजीविकेची साधने असतात. आपल्या कामाशी संबंधित इतर उपक्रम हा छंदाचा भाग ठरू शकत नाही. व्यक्ती आपल्या कामाच्या व्यापातून खास वेळ काढून आपली अभिरुची जोपासत असेल, त्याविषयी बारीकसारीक तपशील- माहिती असेल तर तो छंद ठरू शकेल. साहित्य, संगीत, गायन, वादन, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, जुन्या वस्तू (नाणी, मूर्ती, तिकिटे इ.) यांचा संग्रह, एखादा विशेष क्रीडाप्रकार, चित्रपट पाहणे, पाककौशल्य, योग, पर्यटन, गिर्यारोहण, वाचन, लेखन, काव्यलेखन, संबंधित समाजसेवा इत्यादी. असे किंवा अशा स्वरूपाची अभिरुची ही छंद होऊ शकते.
मुलाखत मंडळाचे सदस्य तज्ज्ञ, अनुभवी असतात. छंदाविषयी ते चौफेर प्रश्न विचारू शकतात. बायोडेटामध्ये एखाद्या छंदाचा उल्लेख करताना त्याविषयी गंभीर असणे आवश्यक आहे. फारसा विचार न करता बरेचसे उमेदवार वाचन, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे असे छंद लिहितात. असे औपचारिक छंद अनेक उमेदवारांसाठी अपयशाचे कारण ठरले आहेत. सध्या आयकर विभागात कार्यरत अधिकारी मित्राने गाणी ऐकणे हा छंद लिहिला होता. काही आवडती गाणी सांगा, आवडते गायक, काही विशिष्ट गाण्यांचे गीतकार अशी प्रश्नांची संख्या वाढत गेली. परिणामी, मुलाखतीत मिळालेल्या कमी गुणांमुळे मुख्य परीक्षेत अतिशय चांगले गुण असूनही शेवटी ‘आयएएस’ची शक्यता खालच्या रँकवर स्थिरावली.
अनेक उमेदवार साधा छंद लिहू या, या नादात वाचन हा छंद नोंदवतात. खरेच वाचनाची आवड असेल, चांगले वाचन असेल तर तसे लिहायला काहीच हरकत नाही. मात्र काय वाचता? कोणत्या प्रकारचे साहित्य आवडते? आवडते लेखक? तेच का आवडतात? त्यांची इतर पुस्तके? अलीकडे वाचलेले पुस्तक अशा प्रश्नांचा सामना करण्याची वैचारिक क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. एका उमेदवाराने ‘छायाचित्रण’ हा छंद लिहिला होता. त्याला पहिलाच प्रश्न विचारला गेला, टेलिलेन्स म्हणजे काय? क्रिकेट खेळायला, पाहायला आवडते म्हणून तो छंद होऊ शकत नाही. मुद्दा हा की, तुम्हाला तुमच्या छंदाविषयी पुरेशी, नव्हे जास्त माहिती असणे अपेक्षित आहे. तुमच्या छंदाबाबतच्या चालू घडामोडी, उद्भवले असल्यास विवाद या संदर्भातील प्रश्नांची अपेक्षा करता येईल. तुमच्या छंदाचा व्यावहारिक उपयोग आहे का, त्यामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का, असल्यास तुम्ही त्या करिअरकडे का वळला नाही, असे प्रश्न अपेक्षित असतात.
आजच्या स्पध्रेच्या युगात, व्यग्र जीवनशैलीत आवश्यक कामांच्या पूर्तीसाठी वेळ काढणे शक्य होत नाही, तिथे छंद जोपासणे केवळ अशक्य आहे; अशी अनेकांची भूमिका असते. बऱ्याचदा इच्छा असूनही वेळेचे नियोजन करता येत नाही. कित्येकांनी कोणताच छंद जोपासलेला नसतो. अशा वेळी औपचारिकता म्हणून किंवा छंद लिहिला नाही असे होऊ नये म्हणून काहीबाही लिहिण्यापेक्षा छंदाचा उल्लेख न केलेलाच बरा. यातून दोन फायदे होतील, एक तर लिहिलेल्या छंदाबाबत चर्चा झाली तर जाळ्यात अडकण्याचा जो धोका असतो तो टळेल. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा तुमचा प्रामाणिकपणा मुलाखत मंडळाच्या समोर प्रकट होईल. छंद नसणे किंवा बायोडेटामध्ये छंदाचा उल्लेख न केल्यामुळे, मुलाखत मंडळ उमेदवाराविषयी नकारात्मक मत बनवून घेत नाही.
छंद असायलाच हवा किंवा तो लिहायलाच हवा असा नियम नाही. पण छंद जोपासला असेल, तो लिहिला असेल तर तुमचा छंद, तुम्हाला मुलाखत मंडळासमोर अभिव्यक्त व्हायला एक चांगली संधी उपलब्ध करून देतो. अशी संधी तुमच्यासाठी यशाची दारे उघडण्याला कारण ठरू शकते. यातून व्यक्तीची अभिरुची, बहुश्रुतता, व्यासंग, चौफेर व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते. जी मुलाखत मंडळाला प्रभावित करते. म्हणूनच छंद असावा व तो जाणिवपूर्वक जोपासावा. तुमच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हे तर स्पर्धा परीक्षेमध्येही यामुळे ‘गुणात्मक’ फरक पडतो हे नक्की.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Your hobies and interview

Next Story
रोजगार संधी
ताज्या बातम्या