डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad) इथे पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट किंवा http://www.bamu.ac.in या लिंकवर भेट देऊन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे तर शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२१ असणार आहे.
या पदासाठी भरती
सुरक्षा अधिकारी (Security Officer)
शैक्षणिक पात्रता काय?
सुरक्षा अधिकारी (Security Officer) या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आहे तसेच सुरक्षेच्या क्षेत्रात अनुभवही आवश्यक आहे.
अर्जाची शेवटची तारीख काय?
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० सप्टेंबर २०२१ आहे. तर १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे अर्जाची हार्ड कॉपी पाठवायची आहे.
कसा अर्ज करायचा?
पदासाठी अर्ज करण्याची पध्दत ही ऑनलाइन स्वरुपाची असेल.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन पहा.