scorecardresearch

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘असा’ करता येईल अर्ज

भरतीची प्रक्रिया ७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

mpsc
ज्यांनी कायद्यामध्ये पदवी घेतली आहे असे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अनेक रिक्त पदांसाठी भरती करण्यास सुरुवात केली आहे. mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार सहाय्यक लोक अभियोजक, गट अ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या रिक्त जागांची संख्या ५४७ इतकी आहे. भरतीची प्रक्रिया ७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

ज्यांनी कायद्यामध्ये पदवी घेतली आहे असे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे १८ ते ३८ वर्ष असावे. आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना नियमांमधून सूट मिळेल. व्यक्तिगत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. अनारक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ७१९ रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ४४९ रुपये आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेसाठी कर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जावे.

स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे.

विनंती केलेली माहिती भरावी आणि अर्ज भरावे.

अर्ज शुल्क भरावे.

अर्जाची एक प्रत डाउनलोड करावी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Golden opportunity to get a job in maharashtra public service commission learn how to apply pvp

ताज्या बातम्या