राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

प्रशासकीय अधिकारी
मुख्य वैद्यकीय सल्लागार
वैद्यकीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता काय हवी?

मुख्य वैद्यकीय सल्लागार या पदासाठी MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रशासकीय अधिकारी या पदासाठी MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.
वैद्यकीय सल्लागार या पदासाठी महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयातून सेवानिवृत्त अधिकारी आणि वीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

पगार किती?

मुख्य वैद्यकीय सल्लागार या पदासाठी सेवानिवृत्त उमेदवरांना सरकारी नियमानुसार आणि इतर उमेदवारांना ८०,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.
प्रशासकीय अधिकारी या पदासाठी सेवानिवृत्त उमेदवरांना सरकारी नियमानुसार आणि इतर उमेदवारांना ७०,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.
वैद्यकीय सल्लागार या पदासाठी सेवानिवृत्त उमेदवरांना सरकारी नियमानुसार वेतन देण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८