आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येतात. या शिष्यवृत्तींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
वैद्यकशास्त्र-अभियांत्रिकी यासह कुठल्याही विषयातील पदवी अथवा पदविका : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात बारावीची परीक्षा कमीत कमी ६० टक्केगुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक वा व्यवसायविषयक अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात दहावीची परीक्षा कमीत कमी
६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांपासूनचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक नसावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एलआयसीची ‘सुवर्णजयंती शिष्यवृत्ती’विषयक जाहिरात पाहावी. आयुर्विमा मंडळाच्या शाखा वा मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा एलआयसीच्या http://www.licindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१४ आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2014 रोजी प्रकाशित
‘एलआयसी’ची सुवर्णजयंती शिष्यवृत्ती
आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येतात.
First published on: 22-09-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lics golden jubilee scholarship