नौसेनच्या युद्ध नौका दुरुस्त करणाऱ्या यार्डमध्ये (Naval Ship Repair Yard) अप्रेंटिसच्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया (Apprentice Recruitment 2021) सुरु झाली आहे. या पदांसाठी सध्या अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती apprenticeshipindia.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना कोणकोणत्या पदांसाठी ही भरती केली जात आहे याबद्दलची माहिती येथे क्लिक करुन उपलब्ध होईल. अपेरंटिसची एकूण १५० पदं रिक्त असून यासाठीच अर्ज मागवण्यात आलेत.

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही मान्यप्राप्त बोर्डामधून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं असणं अनिवार्य आहे. तसेच अर्जदाराकडे ज्या पद्धतीच्या क्षेत्रातील पदासाठी अर्ज करत आहे त्यासंबंधित अप्रेंटिसची पदवीही असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय?
या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांचं वय हे १४ ते २१ वर्षांदरम्यान असावं. तसेच एससी आणि एसटी वर्गातील अर्जदारांसाठी या वयोमानामध्ये पाच वर्षांची सूट देण्यात आलीय.

कशी असणार परीक्षा?
अर्जदारांची लेखी तसेच मुलाखत स्वरुपामध्ये परीक्षा घेतली जाईल. अधिक माहितीसाठी इच्छूक अर्जदार येथे क्लिक करुन सविस्तर तपशील पाहू शकतात.

नौदलाच्या युद्धनौका दुरुस्तीच्या कामांसाठी निवडलेल्यांची नियुक्ती केली जाईल.