भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. ईशान्य रेल्वेने २०२२ च्या गट सी पदांमध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. २६ मार्च २०२२ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार २५ एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

किती पद भरती होणार?

ईशान्य रेल्वे भरती २०२२ मोहिमेद्वारे एकूण २१ गट क पदे भरली जातील. क्रीडानिहाय रिक्त जागा तपशील पाहण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

कोण अर्ज करू शकतो ?

उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावा. तसेच, संबंधित खेळात वरिष्ठ, युवा किंवा कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे. जर आपण वयोमर्यादेबद्दल बोललो, तर उमेदवार १ जुलै २०२२ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावेत. कृपया लक्षात घ्या की कोणत्याही उमेदवाराला उच्च वयोमर्यादेत कोणतीही सूट दिली जाणार नाही. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.

पगार किती मिळेल?

स्तर – २: ग्रेड पे रु १९०० आणि पे बँड रु ५२००- २०२००
स्तर – ३: ग्रेड पे रु २००० आणि पे बँड रु ५२००- २०२००
स्तर – ४: ग्रेड पे रु २४०० आणि पे बँड रु ५२००- २०२००
स्तर – ५: ग्रेड पे रु. २८ आणि पे बँड रु ५२००- २०२००

निवड प्रक्रिया

रेल्वेमधील गट सी पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती चाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन या आधारे केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षा शुल्क

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क २५० रुपये आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी रु ५०० आहे.