scorecardresearch

यूपीएससीची तयारी :  भारत आणि जागतिक महासत्ता

सध्या भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत.

narendra modi jio bidon
(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण चौगले

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर दोनमधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारत व जागतिक महासत्ता यांच्यातील संबंधांवर थोडक्यात चर्चा करणार आहोत. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि जपान आधी महासत्तांशी असणारे द्विपक्षीय संबंध यांचा समावेश होतो. भारताच्या महासत्तांशी असणाऱ्या संबंधांचे अध्ययन करताना दोन्ही देशांमधील लोकशाही, बहुलवादीसमाज, विकास, दोन्ही देश सामोरे जात असलेल्या समान समस्या अशी एककेंद्रांभिमुखता (Convergence), बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार विवाद, पर्यावरणीय वाटाघाटी यांसारखे विवादास्पद (Confrontation) मुद्दे आणि दहशतवाद, प्रदूषण, पर्यावरणीय व जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटींमध्ये समान भूमिका, व्यापाराचा विकास, जागतिक शांतता व स्थैर्य आदी सहकार्यात्मक (Co- Operation) क्षेत्रांना ओळखून या घटकाची तयारी पद्धतशीरपणे करता येते. या लेखामध्ये आपण भारताचे अमेरिका, रशिया आणि जपान यांच्या सोबत असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा आढावा घेऊ. भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनयिक संबंधांची सुरुवात नोव्हेंबर १९४१पासून झाली. अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाबाबत सहानुभूती होती. अमेरिकेला असा विश्वास होता की, भारताने हिटलर विरुद्धच्या संघर्षांमध्ये दिलेल्या सहकार्याच्या बदल्यामध्ये ब्रिटनने भारताला स्वयंशासनाचे वचन द्यावे. भारत अमेरिका संबंधांची अशाप्रकारे सुरुवात झाली होती. या दोन्ही देशांतील संबंधांचे शीतयुद्धकालीन परिस्थिती, भारताकडून अमेरिकेला वेळोवेळी करण्यात आलेली मदत तसेच शीतयुद्धानंतरचा कालावधी व सद्य:स्थितीच्या पार्श्वभूमीवर अध्ययन करणे आवश्यक ठरते. सध्या भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये एककेंद्राभिमुखता वाढत असल्याचे दिसते. शिवाय अमेरिकेच्या पुर्नसतुलन धोरणामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून भारताचे महत्त्व अधोरेखित होते. अलीकडे बायडेन आणि मोदी यांच्यामध्ये झालेली चर्चा आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या संरक्षण आणि विदेश मंत्र्यांमध्ये झालेली  २+२ चर्चा ही युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या आहेत. या संघर्षांमध्ये भारताने युरोप आणि अमेरिकेसारखी भूमिका ठेवावी अशी अमेरिकेची इच्छा होती, तर भारताने आपला पारंपरिक मित्र असलेल्या रशियाशी असलेली मैत्री लक्षात घेऊन विरोधाची भूमिका घेतलेली नाही. यामध्ये भारताला दोन्ही देशांशी सलोख्याचे संबंध व भागीदारी कायम ठेवायची इच्छा दिसून येते.

 Q.  What introduces friction into the ties between India and United States is that Washington is still unable to find for India a position in its global strategy,  which would satisfy India’s National self- esteem ambitions. Explain with suitable examples. 2019.

भारत-रशिया संबंध भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. हे संबंध काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही परंपरेनेच राजकारण, संरक्षण, नागरी अणुऊर्जा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि अंतरिक्ष विज्ञान या पंचसूत्रीवर आधारित असल्याचे दिसते. याबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व प्राप्त होण्याबाबत रशियाने नेहमीच भारताला समर्थन दिले आहे. अलीकडे रशिया आणि चीन यांच्यातील संबंध वृिद्धगत होताना दिसतात मात्र हे संबंध त्या दोन्ही राष्ट्रांसाठी व्यापारी व राजनयिक अपरिहार्यता आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये भारताने घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे पाश्चात्त्य देशांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते. या युद्धामुळे भारतीय परराष्ट्र धोरणाची सत्त्वपरीक्षा दिसून येते, कारण भारताला रशियाबरोबरच युरोप किंवा इतर पाश्चात्त्य राष्ट्रांसोबत असणारे संबंध महत्त्वाचे आहेत.

भारत व जपान यांच्यातील संबंधांना आर्थिक, व्यापारी आणि सामरिक परिमाण लाभलेले आहे. दोन्ही देशांतील निकटच्या संबंधांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहेच, मात्र आशियातील सत्ता संतुलनाच्या दृष्टीने हे संबंध महत्त्वपूर्ण ठरतात. १९९८मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर जपानने भारतावर निर्बंध लादले. तथापि, ‘शांततेसाठी अणु कार्यक्रम’ या भारताच्या तत्त्वाची प्रचीती आल्याने जपानने आपले निर्बंध शिथिल केले. काही वर्षांपासून भारत व जपानचे पंतप्रधान एकमेकांना भेटून आर्थिक पायाभूत सुविधा संरक्षण व्यापार-उदीम माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक आदानप्रदान अशा क्षेत्रातील संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात संघर्षांची परिस्थिती असताना जपानने भारताच्या भूमिकेला पािठबा दिला होता. चीनने केलेल्या आर्थिक प्रगतीने जपानच्या आर्थिक वर्चस्वाला शह दिला आहे. गेली काही वर्षे हिंदूी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रातील चीनचा वावर आणि वाढते वर्चस्व रोखण्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे आहे.

 Q.  Economic ties between India and Japan while growing in the recent years are still far below their potential.  Elucidate the policy constraints which are inhibiting this growth. 2013

हा घटक चालू घडामोडींवर आधारित आहे. याकरिता पंतप्रधानांचे विदेश दौरे, या मध्ये झालेले करार, शिखर परिषदा इ. बाबींचा नियमित मागोवा घेणे उचित ठरेल. या घटकाच्या तयारीकरिता परराष्ट्र मंत्रालय, व  कऊरअ चे संकेतस्थळ, ‘इंडियन एक्सप्रेस’ ही वृत्तपत्रे व ‘वल्र्ड फोकस’ हे नियतकालिक वापरता येईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Preparation of upsc exam in marathi zws

ताज्या बातम्या