NHRC Recruitment 2022: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ट्रांसलेटर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ३१ मार्च २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट nhrc.nic.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. आयोगाने भाषांतरकाराच्या ४३ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना ११ मार्च २०२२ रोजी जारी करण्यात आली होती. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ते या पदांसाठी नोंदणीकृत पोस्टाद्वारे देखील अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्त पदांची संख्या

तमिळ – ७

तेलुगु – ५

गुजराती – ३

मराठी – २

बंगाली – १२

उडिया – १०

उर्दू – १

आसाम – १

कन्नड – २

(हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिक)

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

(हे ही वाचा: Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात दहावी पाससाठी नोकरीची संधी, १५३१ रिक्त जागा)

या पत्त्यावर पाठवता अर्ज

उमेदवार शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA नवी दिल्ली – 110023 येथे आपले अर्ज पाठवू शकतात.

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार)

महत्त्वपूर्ण तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – ११ मार्च २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२२

Web Title: Recruitment 2022 job opportunities for graduate candidates know more details ttg
First published on: 16-03-2022 at 13:19 IST