स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने SBI लिपिक निकाल जारी केला आहे. एसबीआय लिपिक प्रारंभिक परीक्षेला बसलेले उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडिया च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल (SBI Clerk Result 2021) तपासू शकतात. एसबीआय लिपिक प्राथमिक परीक्षा १७ ऑगस्ट २०२१ ते १९ ऑगस्ट २०२१ दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेद्वारे ज्युनिअर असोसिएट लिपिकाच्या एकूण ५ हजार पदांची भरती केली जाणार आहे.
याशिवाय उमेदवार https://sbi.co.in/web/careers या लिंकवर क्लिक करून थेट त्यांचा निकाल (SBI Clerk Result 2021) तपासू शकतात. तसेच खाली दिलेल्या या स्टेप्सला फॉलो करून देखील उमेदवार त्यांचा निकाल तपासू शकतात.
असा तपासा निकाल
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटच्या करियर विभागात जा.
एसबीआय लिपिक निकाल 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
स्क्रीनवर असलेला कॅप्चा कोड टाकून आणि सबमिट करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल तपासा आणि पुढील कामाकरिता हा निकाल सेव करा.
मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर
भारतीय स्टेट बँकेतर्फे लिपिक भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. पूर्वपरीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in वर जाऊन प्रवेशपत्र (SBI Clerk Mains Admit Card 2021) डाउनलोड करू शकतात. एसबीआय प्रीलिम्सचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
SBI लिपिक मुख्य परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल. विद्यार्थ्यांना 200 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क कापला जाईल. प्रीलिम्स परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी अशा फेऱ्या पार कराव्या लागतील.