क्रीडा क्षेत्रात नोकरी शोधणार्या उमेदवारांना आता संधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च क्रीडा संस्था भारतीय क्रीडा प्राधिकरणाने २२० सहाय्यक प्रशिक्षकांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने चार वर्षांसाठी असणार आहे. भरती करण्यात येणार्या विविध पदांसाठी सहाय्यक प्रशिक्षकांच्या भरतीकरिता इच्छुक उमेदवारांनी १० ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. तसेच उमेदवारांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या या अधिकृत वेबसाइट https://sportsauthorityofindia.nic.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील
तिरंदाजी- १३ पदे
अॅथलेटिक्स -२० पदे
बास्केटबॉल- ०६ पदे
बॉक्सिंग- १३ पदे
सायकलिंग -१३ पदे
तलवारबाजी -१३ पदे
फुटबॉल- १० पदे
जिम्नॅस्टिक्स- ०६ पदे
हँडबॉल- ०३ पदे
हॉकी- १३ पदे
ज्युडो – १३ पदे
कबड्डी – ०५ पदे
कराटे- ०४ पदे
कयाकिंग आणि कॅनोइंग- ०६ पदे
खो-खो – ०२ पदे
रोइंग- १३ पदे
सेपक टकारा- ०५ पदे
नेमबाजी- ०३ पदे
सॉफ्टबॉल- ०१ पद
जलतरण – ०७ पदे
टेबल टेनिस- ०७ पदे
तायक्वांदो- ०६ पदे
व्हॉलीबॉल- ०६ पदे
वेटलिफ्टिंग- १३ पदे
कुस्ती – १३ पदे
आवश्यक कौशल्ये
उमेदवारांनी SAI, NS, NIS किंवा कोणत्याही देश किंवा परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोचिंगमध्ये डिप्लोमा डिग्री पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांनी ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असावा किंवा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला असावा. यासाठी उमेदवाराचे वय ४० वर्षे असावे.
सहाय्यक प्रशिक्षक वेतन
भारतीय क्रीडा प्राधिकरण सहाय्यक प्रशिक्षक या पदांवर इच्छुक उमेदवार भरती झाल्यास त्यांना ४१,४२० ते ११२,४०० रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.